Ginger Milk Benefits : दूध हा असा एक प्रकार आहे जो लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. अर्थात दूध पिणे प्रत्येकाला आवडत नाही. मात्र, तुम्ही जर लहानपणापासूनच मुलाला दूध पिण्याची सवय लावली तर त्याचा मुलाच्या वाढीवर तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा होईल. यासाठीच डॉक्टरसुद्धा मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात.     


दूध हे शरीरासाठी फायदेशीर  तर आहेच, पण त्याचबरोबर दुधामध्ये जर काही हंगामी पदार्थांचा समावेश केला तर यामुळे तुम्हाला डबल फायदे मिळू शकतात. तुम्ही दुधात अद्रक टाकून दूध घेतले तर यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच तुमचे वजनही कमी होऊ शकते. पावसाळ्यात अद्रक आणि दूध एकत्र पिण्याचे नेमके कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात.  


प्रतिकारशक्ती वाढते : 


जर तुम्ही पावसाळ्यात अद्रक आणि दुधाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होईल. दुधासोबत अद्रकचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


पचनशक्ती होईल मजबूत : 


अद्रक आणि दुधाचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते. यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता या समस्यांवर मात करता येते. याशिवाय अद्रक आणि दूध इतर अनेक पचन समस्या दूर करण्यासाठी गुणकारी आहे. 


खोकला आणि सर्दीपासून आराम : 


पावसाळ्यात खोकला आणि सर्दीच्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अद्रक आणि दुधाचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे घसा खवखवणे आणि खोकला कमी होऊ शकतो. हे डोळ्यांभोवती सूज देखील कमी करू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :