Health Tips : निरोगी राहण्यासाठी, हृदय निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. हृदय हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जो संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत, निरोगी राहण्यासाठी आपल्या हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, आपली बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. 

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे ही यातील एक समस्या आहे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, औषधे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच, आपल्या जीवनशैलीत काही बदल केल्यास, नैसर्गिकरित्या आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू शकता. या बदलांबद्दल जाणून घेऊयात. 

आहारात फायबरचा समावेश करा

जर तुम्हाला तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करायची असेल तर तुमच्या आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. फायबर तुमच्या रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करू शकते. यासाठी तुम्ही राजमा, कडधान्य, सफरचंद आणि नाशपातीसारखे पदार्थ खाऊ शकता.

वजन कमी करा

तुमचे वजन जास्त असेल किंवा लठ्ठपणा जाणवत असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन कमी केल्याने एलडीएल खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या इतर गंभीर समस्यांपासूनही आराम मिळतो.

कर्बोदकांचा समावेश करा

संशोधनात असे दिसून आले आहे की, कमी-कार्ब खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या आहारात ओट्सचे जाडे भरडे पीठ, संपूर्ण धान्य, बीन्स, मसूर आणि संपूर्ण फळे यांसारख्या उच्च फायबर कार्बोहायड्रेट्सचा समावेश करू शकता, ज्याच्या मदतीने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील आणि तुम्हाला लवकर भूक लागणार नाही.  

शाकाहारी आहाराचे सेवन करा

जर तुम्ही मांसाहारी असाल तर आठवड्यातून काही दिवस शाकाहारी आहार घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी प्राण्यांवर आधारित प्रथिने खाण्याऐवजी तुम्ही डाळी, पनीर किंवा क्विनोआ यांसारखी वनस्पती आधारित प्रथिने तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर