Health Tips : प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात एक सहज आढळणारी गोष्ट म्हणजेच घरगुती मसाले. हे मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढविण्यासाठी वापरले जातात. यामुळे तुमचं जेवण अधिक चविष्ट आणि रूचकर होते. याशिवाय हे मसाल्याचे पदार्थ आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत करतात. हे मसाल्याचे पदार्थ एकमेकांत मिक्स होऊ नयेत यासाठी ते वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवले जातात. अनेक वेळा असे होते की, आपण काही मसाले चांगल्या प्रकारे साठवून ठेवतो, परंतु त्यांचा सुगंध काही दिवसांतच नाहीसा होतो. त्यामुळे त्याची चव पूर्वीसारखी राहत नाही. 


अनेकदा लवंग, वेलची इत्यादी व्यवस्थित साठवून ठेवल्या नाहीत तर त्याचा सुगंध कमी होतो. आज आम्‍ही तुम्‍हाला हे घरगुती मसाले साठवण्‍याच्‍या काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहील.


तुमचे मसाले दिर्घकाळ टिकावेत यासाठी या काही टिप्स फॉलो करा



  • जर तुम्ही स्वयंपाकघरात मसाले ठेवत असाल तर सर्वात आधी तुम्ही ते हवाबंद डब्यात ठेवा आणि घट्ट झाकून ठेवा. यामुळे त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहील.

  • गॅसजवळ कधीही मसाले ठेवू नका. किचन कॅबिनेटच्या आतल्या ठिकाणी ठेवा. यामुळे मसाले जास्त काळ टिकतील आणि त्यांचा सुगंध कायम राहील.

  • मसाले कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते खराब होतात आणि जास्त काळ टिकत नाहीत. ते फक्त बंद ठिकाणी साठवले पाहिजेत.

  • मसाले संपूर्ण साठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते जास्त काळ टिकतील आणि खराब होणार नाहीत. याशिवाय त्यांचा सुगंधही तसाच राहतो.

  • मसाले साठवण्यासाठी, प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या भांड्यात ठेवा. यामुळे ते दीर्घकाळासाठी चांगले राहतात.

  • मसाले खराब होण्यापासून रोखण्यासाठी मीठाचा वापर करा. मसाल्यांमध्ये मीठ घाला. यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. मात्र, पावसाळ्यात त्यात मीठ घालू नका.


जर तुम्हालाही तुमचे मसाले दिर्घकाळ टिकावेत असं वाटत असेल तर तुम्ही या काही टिप्स फॉलो करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुमचे मसाले कधीही खराब होणार नाहीत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा