Health Tips : ऑफिसच्या ठिकाणी, शाळा किंवा कॉलेजमध्ये जाताना आपण अनेकदा आपल्याबरोबर पाण्याची (Water) बॉटल बरोबर ठेवतो किंवा आपल्या स्वतंत्र ग्लासाने आपण दिवसभर पाणी पितो. एवढेच नाही तर लहान मुले दिवसभर तेच सिपर वापरतात. पण, एकच सिपर किंवा एकाच ग्लासातून, एकाच बाटलीतून सारखं पाणी पिणं खरंच आरोग्यदायी आहे का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला देखील हीच सवय असेल तर वेळीच तुम्ही सावध होणं गरजेचं आहे.
मटेरियल कोणतंही असो वापर करू नका
अनेकदा आपण असा विचार करतो की काचेच्या बाटलीतून पाणी पिणं सर्वात सुरक्षित आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, मटेरियल कोणतंही असो पण पाण्याची बाटली प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी ती बॉटल नीट स्वच्छ पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे. जर ग्लासाला न धुता वारंवार त्याचा वापर केला जात असल्यास त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे जुलाब होणे, पोटात दुखणे, उलट्या होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
पाण्यात सूक्ष्मजीव वाढू लागतात
संशोधनातून असे दिसून आले आहे की, पाण्याला एकाच ठिकाणी अधिक काळासठी ठेवल्यास त्यामध्ये जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वेगाने वाढ होते. हे सूक्ष्मजीव आपल्या शरीराचं आतून नुकसान करतात. जेव्हा आपण ग्लसाने बाटलीत पाणी भरतो तेव्हा त्यात अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू, म्हणजेच अगदी लहान जंतू वेगाने वाढू लागतात. यामुळे आपल्या शरीराचे आतून नुकसान होऊ शकते. तुम्हीही दिवसातून अनेक वेळा एकाच ग्लास किंवा बाटलीतून पाणी पित असाल तर वेळीच तुमची ही सवय बदला.
दररोज ताजं पाणी भरा
आपण अनेकदा त्याच बाटलीत पाणी भरून ठेवतो आणि जेव्हा त्या बाटलीतलं पाणी संपतं तेव्हा ती बॉटल न धुता त्यातच पाणी पुन्हा भरतो. पण, ही सवय आपल्या आरोग्यासठी धोकादायक ठरू शकते. दुसऱ्या दिवसापर्यंत पाणी प्यायले नाही आणि त्यात ठेवले तर ते फेकून द्यावे. त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात जे आपल्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे रोज पाण्याची बॉटल धुवून त्यात ताजं पाणी भरणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.