Health News : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाढते वजन (Weight Loss) एक समस्या बनत चाललीय. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे लोकांचे वजन नियंत्रणात राहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक जण यापासून बचाव व्हावा म्हणून डाएट आणि व्यायाम म्हणजेच वर्कआऊट करतात. पण सध्याची परिस्थिती पाहता काही लोकांना वर्कआउट करून आणि डाएट फॉलो करूनही वजन कमी करण्यात समस्या येतात. अशात प्रश्न पडतो की, एवढी मेहनत करूनही वजन का कमी होत नाही? असे का होते? आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे यामागील विज्ञान लोकांसोबत शेअर केले आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हे देखील सांगितले आहे.


 


डाएट, वर्कआउट करूनही वजन जसे च्या तसे!


अनेक लोकांना वजन कमी करायचं तर असतं, त्यासाठी ते खूप मेहनतही घेतात. मात्र काही लोकांना वजन कमी करण्यात प्रचंड अडचणी येतात. बरेच लोक योग्य आहाराचे पालन करतात, भरपूर व्यायाम देखील करतात. मात्र असे असूनही त्यांचे वजन आहे तसेच आहे. अशावेळी त्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो की, मी योग्य आहार तर घेत आहे, वजन कमी करण्याचा व्यायाम देखील करतेय, तरीही माझ्या हातावर, पायांवर, पोटावर आणि चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी कशी दिसून येते? पण इतके कष्ट करूनही वजन कमी न होण्यामागे काही कारणे असू शकतात. काही लोक कठोर परिश्रम करूनही वजन का कमी करत नाहीत हे तज्ज्ञ सांगत आहेत. काही लोकांचे वजन का कमी होत नाही? अशावेळी तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे देखील जाणून घ्या.


 


 






 


Weight Loss चा ट्रेंड!


आजकाल ठिकठिकाणी आपण वेट लॉसची जाहीरात पाहतो. सध्या बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लोक याला एक सामान्य समस्या मानतात तर ती एखाद्या आजारापेक्षा कमी नाही. जर ते कमी केले नाही किंवा नियंत्रित केले नाही तर शरीर रोगांचे घर बनू लागते. यामुळेच आज धावपळीच्या युगात सगळ्यांनाच झटपट वजन कमी करायचंय.. तसेच गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक जिम मध्ये जाऊन घाम तर गाळतातच, सोबत वर्कआउटमध्ये महागडे डाएट प्लॅन्स आणि आधुनिक पद्धतीचा वापर करतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांचा धोका वाढतो, असे संशोधनातून समोर आले आहे. अशावेळी वजन कमी करू इच्छिणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी किती वेळ लागतो? काही लोक प्रयत्न करूनही अनेकांचे वजन कमी होत नाही? त्याची महत्त्वाची कारणे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या...


वजन कमी करण्यात समस्या का येतात?


आहारतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) लवनीत बत्रा याबाबत सांगतात की, वर्कआउट करून आणि डाएट फॉलो करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर निकृष्ट आहार, हार्मोनल असंतुलन, झोप न लागणे आणि तणाव यासारखी काही कारणे कारणीभूत असू शकतात. इन्स्टा वर पोस्ट शेअर करताना त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली. जर तुम्ही प्रथिने आणि कॅलरीजचे योग्य सेवन केले नाही तर त्यामुळे वजन कमी करण्यात समस्या निर्माण होऊ शकते. पुरेशी झोप न मिळाल्यास, तणावात मग्न राहिल्यास या सगळ्याचा परिणाम मनावर होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते.


तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी लक्षात ठेवा


लवनीत त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगतात की, प्रथिने स्नायूंची दुरुस्ती, चयापचय वाढवणे यासारखे फायदे देतात. मसूर, चणे, क्विनोआ आणि टोफूच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आहारातील प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे प्रमाण वाढवू शकता.


अभ्यासात असे दिसून आले आहे की, दीर्घकाळ कमी कॅलरी आहार घेतल्यास चयापचय 23 टक्के कमी होतो. तुमचे वजन कमी होते. पण तुमच्या कॅलरीजचे प्रमाण राखणे गरजेचे आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कॅलरीजची संख्या योग्य ठेवा.


हार्मोनल असंतुलनामुळे वजन कमी करण्यात समस्या असू शकते. तुम्हाला दीर्घकालीन समस्या असल्यास हार्मोनल असंतुलन तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.


पुरेशी झोप न मिळाल्याने वजन नियंत्रणावर परिणाम होतो. दररोज 7 ते 9 तासांची झोप घ्या. असे केल्याने तणाव दूर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.


तज्ज्ञ लवनीत सांगतात की, जास्त तणावामुळे हार्मोनल असंतुलन देखील होते. ज्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. योग, ध्यान किंवा इतर खोल श्वासोच्छवासाच्या व्यायामाद्वारे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health News : मासिक पाळी चुकली, उशीरा आली! गर्भधारणा की आणखी काही? घाबरू नका! लक्षणं जाणून घ्या