Happy New Year 2023 : जसजसं नवीन वर्ष जवळ येऊ लागलं आहे तसतसे लोक नवीन वर्षातील संकल्प करायला लागले आहेत. या संकल्पात अनेक प्रकार आहेत. कुणी बचतीचा संकल्प करतात, तर कुणी आरोग्याशी संबंधित संकल्प करतात. तर कोणी व्यसनमुक्तीचा संकल्प करतात. हे संकल्प किती जरी चांगले असले तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे. कारण काही कारणांमुळे हे संकल्प मध्येच सोडून दिले जातात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत की ज्यामुळे तुुम्ही तुमचे संकल्प पूर्ण करू शकता. 

  


संकल्प करण्याचा निश्चय ठेवा 


सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा दृढ निश्चय असणे गरजेचे आहे. खरंतर जेव्हा तुम्ही एखादा संकल्प करता तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक गोष्टींत बदल करावे लागतात. तुमची मूळ सवय सोडून द्यावी लागते आणि चांगल्या सवयी अंगिकाराव्या लागतात. नवीन सवयी लवकर आत्मसात कराव्या लागतात आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही निश्चय करण्याआधी तुमचा दृढ निश्चय असणे गरजेचे आहे.   


दुसऱ्याकडे पाहून संकल्प करू नका 


आजचे युग हे स्पर्धेचे आहे. अनेकजण इतरांचे संकल्प पाहून आपले संकल्प ठरवतात. मात्र, असे संकल्प जर तुम्ही करत असाल तर यामध्ये तुम्हाला कधीही यश येणार नाही. कारण तुम्ही तो संकल्प मनापासून केलेला नसतो. तुम्ही करत असलेल्या संकल्पाचे फायदे-तोटे लक्षात घेऊन तो संकल्प करावा. त्यामुळे जास्त वेळ त्या संकल्पावर तुम्ही अवलंबून न राहता, किंवा दुसऱ्यांचा संकल्प न पाहता स्वत:ला कोणता संकल्प करावासा वाटतो त्या बाबतीत विचार करावा.    


स्वत:ला समजावून सांगा 


आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण नवीन गोष्ट स्विकारतो आणि जुन्या गोष्टी सोडतो तेव्हा सुरुवातीला बराच त्रास होतो.  तुमच्या मनातील ही छोटीशी गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही एखादी गोष्ट सोडण्याचा संकल्प करत असाल तर तुमच्या मनाला सांगा की या गोष्टीमुळे तुमचे आर्थिक आणि शारीरिक नुकसान काय होत आहे. तसेच, जर तुम्ही काही नवीन स्वीकारत असाल तर त्याबद्दल तुमच्या मनाला समजावून सांगा की या गोष्टीतून तुम्हाला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या काय फायदा होणार आहे. जर तुम्ही तुमच्या मनातून पूर्ण तयारी केली तर तुमचा संकल्प कोणीही मोडू शकणार नाही.   


महत्त्वाच्या बातम्या : 


Happy New Year 2023 : भारतात 31 डिसेंबरला 12 वाजता 'Happy New Year'ची सुरुवात; 'या' देशांत त्याआधीच सेलिब्रेशन