Kiss Day: व्हॅलेंटाईन वीक आता संपायला दोन दिवस राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या आधीचा एक दिवस म्हणजे किस डे. जगभरात व्हॅलेंटाईन वीक उत्साहाने साजरा सुरु असल्याचं पहायला मिळतंय. त्यातला किस डे हा कपल्स डे म्हणून 13 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. या दिवसाने कपल्समधील प्रेम भावनात्मकरित्या अजून भक्कम होण्यास मदत होतेय.


किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातोय. कारण आपल्या भावना रोमॅन्टिक आणि अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस तो काय असू शकतो. ते आपल्या मनातील भावना कोणत्याही शब्दाविना व्यक्त करतात.


चुंबन हे फक्त आपल्या प्रियसीचे अथवा प्रियकराचेच घेतले जाते असे नाही. त्यामागच्या भावनाही वेगवेगळ्या आहेत. चुंबन हे नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे त्याच्या आईकडून घेतले जाते, वृद्ध माता-पित्यांचे आपल्या मुलांकडून घेतले जाते... किंवा आपल्या बहिण-भावाचे घेतले जाते. अशा अनेक भावना चुंबनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतात. त्यामुळे या दिवसाचे महत्व काही वेगळेच आहे.


Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा.....


प्रेमीयुगलांसाठी या दिवसाचे महत्व खूपच आहे. चुंबन हे प्रेम, पॅशन, आदर, मैत्री अशा विविध भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे, तेही रोमॅन्टिक पद्धतीनं. महत्वाचं म्हणजे चुंबनाचे काही आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यामुळे एखाद्याच्या मनावरील तणाव दूर होतो. चुंबन करताना आपल्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन्स तयार होतंय. त्यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदक होते.


तर मग आजच्या दिवशी चुंबन दिवस किंवा किस डे साजरा करताना हे लक्षात ठेवा की त्या 'किस' प्रमाणे तुमचे आयुष्यही एकमेकांशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या भावना एकमेकांशी ओठाच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी चालून आलीय. त्यामुळे ही संधी दवडू नका.


Teddy Day 2021: प्रेमीयुगलांसाठी खास आहे टेडी-डे, आपल्या जोडीदाराला असं करा इम्प्रेस