Hairloss Homemade Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणे (Hair Loss) ही समस्या झपाट्याने वाढत आहे. ताणतणाव, प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक प्रॉडक्ट्सचा अतिवापर हे यामागील मुख्य कारणं मानली जातात. महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स अनेकदा परिणामकारक ठरत नाहीत, अशा वेळी घरगुती उपाय हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग ठरू शकतो. या उपायांमध्ये वापरले जाणारे घटक नैसर्गिक असल्याने त्यांचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.

Continues below advertisement

 1. नारळ तेल आणि लिंबाचा मिश्रण

-नारळ तेल हे केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी ओळखले जाते. यात असलेले फॅटी ऍसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना मजबूत करतात. -दोन चमचे नारळ तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळा, हलकं कोमट करा आणि टाळूवर मसाज करा.-30 मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा.- हा उपाय केस गळणे आणि कोंडा दोन्ही नियंत्रित करतो.

 2. मेथीच्या बियांचा पेस्ट

- मेथीमध्ये निकोटिनिक ऍसिड आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात, जे नवीन केस वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. - एक चमचा मेथी रात्रीभर पाण्यात भिजवून ठेवा.- सकाळी ती वाटून पेस्ट तयार करा आणि टाळूवर लावा.- 30-40 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.- आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास केस गळतीत स्पष्ट फरक दिसेल.

Continues below advertisement

 3. आवळा आणि दह्याचा मास्क

- आवळा म्हणजे व्हिटॅमिन C चा नैसर्गिक स्रोत आहे. तो केसांच्या मुळांना बळकटी देतो आणि अकाली पांढरे होणं थांबवतो. - एक चमचा आवळा पावडरमध्ये दोन चमचे दही मिसळा.  हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि 30 मिनिटं ठेवा.-- हा उपाय स्कॅल्पला थंडावा देतो आणि केसांना घनता व मजबुती देतो.

 4. अलोवेरा जेलचा वापर

-अलोवेरामध्ये असलेले एन्झाईम्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म केसांची वाढ वाढवतात आणि स्कॅल्पवरील सूज कमी करतात.- ताज्या अलोवेरा पानातून जेल काढा आणि थेट टाळूवर लावा.- 45 मिनिटांनंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा.- नियमित वापराने केस मऊ, रेशमी आणि चमकदार बनतात.

5. कांद्याचा रस

कांद्यात सल्फर भरपूर प्रमाणात असतं, जे कोलेजन निर्मिती वाढवून केसांच्या वाढीस मदत करतं.- कांद्याचा रस काढा आणि कॉटनच्या साहाय्याने स्कॅल्पवर लावा.- 30 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा.- सुरुवातीला थोडी वासाची अडचण होईल, पण पहिल्याच आठवड्यात परिणाम दिसू लागतात.

नैसर्गिक उपायांचा फायदा

या उपायांनी केसांची मुळे मजबूत होतात, गळती कमी होते आणि केस अधिक घनदाट, मऊ आणि चमकदार दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रासायनिक प्रॉडक्ट्सपासून दूर राहा, संतुलित आहार आणि ताणमुक्त जीवनशैली पाळा. हेच केसांच्या आरोग्याचं खऱ्या अर्थाने गुपित आहे.