Hair Care Tips : कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो. भारतीय स्वयंपाकघरात तर तो अगदी सहज आढळून येतो. पण, कढीपत्ता आरोग्याबरोबरच आपल्या केसांसाठीही गुणाकरी आहे. कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीनिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. चला तर जाणून घेऊयात केसांसाठी कढीपत्त्याचे फायदे नेमके कोणते आहेत.


केस गळणे कमी करण्यास मदत 


एखाद्या व्यक्तीचे दररोज 50 ते 100 केस गळणे सामान्य आहे. परंतु, जर तुमचे यापेक्षा जास्त केस गळत असतील तर ते सामान्य नाही. अशा परिस्थितीत कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, कढीपत्त्यामध्ये हिबिस्कसचा अर्क मिसळून लावल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होते. कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट केसांच्या छिद्रांना घट्ट करतात आणि तुमच्या टाळूला मॉइश्चराईझ करतात, ज्यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते आणि केस गळणे थांबते.


केसांची वाढ होते


केसांच्या चांगल्या वाढीसाठी कढीपत्ता खूप उपयुक्त आहे. हे केसांची बंद छिद्रे उघडते, ज्यामुळे त्यांना श्वास घेणे सोपे होते. कढीपत्ता, आवळा आणि मेथीचे तेल यांचे मिश्रण केसांना लावल्याने केसांची वाढ लवकर होते. एका संशोधनात असे आढळून आले की, 7 ते 9% कढीपत्त्याचे तेल केवळ 6 दिवसांत केसांच्या कूपांच्या वाढीस प्रोत्साहन देते.


लांब आणि मजबूत केस


कढीपत्त्यात असे गुणधर्म असतात ज्यामुळे केस लांब आणि मजबूत होतात. या पानांमध्ये असलेले प्रथिने, व्हिटॅमिन बी 6 आणि बीटा कॅरोटीन केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात, केसांची मुळे सुधारतात आणि आपल्या केसांच्या एकूण आरोग्यास फायदा देतात. केसांच्या पॅकमध्ये तुम्ही कढीपत्त्याचे तेल घालू शकता आणि केसांना मुळांपासून मजबूत करण्यासाठी ते नियमितपणे वापरू शकता.


खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत


आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि झपाट्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे केसांचे खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, कढीपत्ता प्रदूषक आणि मुक्त रॅडिकल्सच्या नकारात्मक प्रभावांशी लढण्यास मदत करते. या पानांच्या अर्काचा केसांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. हे तुमचे केस निरोगी, तरुण आणि मजबूत बनवते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय