Guru Purnima 2025 : दरवर्षी देशभरात गुरुपौर्णिमा हा दिवस मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी वेद व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. महर्षी वेद व्यास हे महाभारत तसेच 18 पुराणांचे लेखक आहेत.म्हणून या दिवशी गुरुची पूजा केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. वेद व्यास हे पहिले गुरु मानले जातात. यानिमित्ताने, पतंजली वेलनेस, योगपीठ-2 येथील योग भवन सभागृहात पतंजली योगपीठाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी रामदेव (Baba Ramdev) आणि सरचिटणीस आचार्य बालकृष्ण (Balkrishna) यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2025) साजरी करण्यात आली.

स्वामी रामदेव यावेळी नेमकं काय म्हणाले?

या प्रसंगी स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एकमेकांना पुष्पहार अर्पण केले आणि एकमेकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमादरम्यान स्वामी रामदेव म्हणाले की, गुरुपौर्णिमा हा सनातन धर्म स्थापनेचा उत्सव आहे. ते पुढे म्हणाले की, हा भारताची गौरवशाली गुरु-शिष्य परंपरा आणि सनातन परंपरा पूर्ण करण्याचा उत्सव आहे. यावेळी स्वामी रामदेव म्हणाले की, वेद आणि गुरु धर्मात राष्ट्रीय धर्माचाही समावेश आहे. ते म्हणाले की, आज संपूर्ण जगात वर्चस्वासाठी लढाई सुरू आहे. वर्चस्व सत्य, योग, अध्यात्म आणि न्यायाचे असले पाहिजे.

आचार्य बाळकृष्ण यांनी केले गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट 

या प्रसंगी आचार्य बाळकृष्ण पुढे म्हणाले की, गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्य यांच्या परंपरेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो तेव्हाच ते अर्थपूर्ण ठरते. ते म्हणाले की, गुरु-शिष्य परंपरा, योग, आयुर्वेद, सनातन आणि वैदिक ज्ञानाच्या माध्यमातूनच भारत जागतिक नेता बनेल. दरम्यान, कवड मेळ्याव्यानिमित्त हरिद्वारमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. देशातील विविध राज्यांमधून भाविक कवड घेण्यासाठी हरिद्वारला पोहोचत आहेत. या प्रसंगी, पतंजली योगपीठाने एका अखंड मेजवानीची व्यवस्था केली आहे ज्यामध्ये भक्तांना अन्न दिले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या