मुंबई: हृदय विकाराच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियाच्या उल्सान नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांनी एका नव्या सेंसरचा शोध लावला आहे. याच्या माध्यमातून डॉक्टरांना आता केवळ एका मिनिटांत हृदय विकारचे निदान करता येणार आहे.
हा सेंसर हृदय विकाराच्या झटक्यानंतर ट्रोपोनिन नावाच्या प्रोटीनचा स्तर मोजण्याचे काम करतो. यापूर्वी या प्रोटीनचा नेमका स्तर मोजण्यासाठी एक तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे या नव्या शोधाने हृदय रोगावर तत्काळ निदान करणे शक्य होणार आहे.
अद्याप यावरील संशोधन सुरु असल्याचे तज्ज्ञांना सांगितले. विशेष म्हणजे, या शोध मंडळाच्या चमूमध्ये अभिनव शर्मा या भारतीयाचाही समावेश आहे.