Ganesh Visarjan 2020 Vidhi | सध्या देशभरात गणेशोत्सवर आनंदात साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या सावटात उत्सव जरी साधेपणाने साजरा करण्यात येत असला तरी भाविकांमध्ये उत्साह मात्र तोच आहे. 21 ऑगस्ट रोजी घराघरांत गणरायाचं आगमन झालं असून 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. अशी मान्यता आहे की, या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्या प्राप्त होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ज्याप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात येते त्याच प्रकारे विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप देणंही महत्त्वाचं असतं.


गणेश विसर्जनाची विधि


अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणरायाची पूजा करण्यात येते. गणपतीला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. गणेश मंत्र आणि गजाननाची मनोभावे आरती करा. पूजा करण्याआधी स्वस्तिक काढा आणि विधिवत पूजा करा. विसर्जन करताना या गोष्टीची काळजी घ्या की, गणरायाचं विसर्जन आदराने आणि भक्तिभावाने करावं.


अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त


1 सितंबर 2020 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाचा मुहूर्त


सकाळचा मुहूर्त : सकाळी 09:10 पासून ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा दुपारचा मुहूर्त : दुपारी 15:32 पासून ते संध्याकाळी 17:07 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी 08:07 पासून ते 9:32 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा रात्रीचा मुहूर्त : रात्री 10:56 पासून ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत