Monsoon Hacks : पावसाळा आला की आल्हाददायक वातावरणासोबत विविध प्रकारचे आजार घेऊन येतो. अशात भाजीपाल्याचे भाव देखील वाढल्याचं आपण पाहतो. वांगी, टोमॅटो असो की कोबी, पावसाळ्यात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडतात. पावसाळ्यात भाज्यांचे वाढलेले भाव टाळण्यासाठी लोक हिरव्या भाज्यांऐवजी कडधान्य जसे की, हरभरा, चणे, राजमा, मसूर या भाज्या खाण्यास सुरुवात करतात. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळावे. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही काही भाज्या वाळवून देखील खाऊ शकता, पण ते कसं शक्य आहे? जाणून घ्या


 


हिरव्या भाज्या खाण्यास डॉक्टरांचा नकार


तज्ज्ञ आणि डॉक्टर पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाण्यास अनेकदा नकार देतात, कारण या हंगामात इतर ऋतूंच्या तुलनेत भाज्यांमध्ये जास्त खतं आणि औषधे टाकली जातात. भाजीपाला पाण्यामध्ये चांगला वाढावा आणि किडे होऊ नयेत यासाठी शेतकरी भाजीपाला अधिक औषधे आणि खते घालतात. ही विषारी खते आणि औषधे भाज्यांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतात, जी आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही.


 


मान्सूनच्या महागाईच्या तडाख्यापासून असे वाचाल!


पावसाळ्यात बाजारात भाज्यांचा तुटवडा असल्याने त्यांच्या दरात वाढ होते, गतवर्षी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. टोमॅटोशिवाय कोथिंबीर, मिरची, कोबी, पालक यासह इतर भाज्यांचे दरही वाढले होते. भाज्यांचे दर वाढल्याने नागरिकांना भाजीपाला खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत, मान्सूनच्या महागाईपासून वाचण्यासाठी आम्ही एक युक्ती घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि मान्सूनच्या महागाईच्या तडाख्यापासूनही तुम्हाला वाचता येईल.


या भाज्या उन्हात वाळवल्यानंतर वापरा


वांगी


पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही ताज्या भाज्यांऐवजी कोरड्या भाज्या खाऊ शकता, अशा परिस्थितीत वांग्याचे तुकडे करून उन्हात वाळवा. वांगी उन्हात चांगली सुकल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. वापरण्यापूर्वी गरम पाण्यात उकळा, नंतर भाजी म्हणून वापरा.



टोमॅटो


अनेकदा पावसाळ्यात टोमॅटोचे भाव वाढतात, अशा परिस्थितीत टोमॅटो कमी किमतीत मिळतात, तेव्हा टोमॅटोचे गोल किंवा लांबट तुकडे करून उन्हात सोडा. टोमॅटो सुकल्यावर त्याची पावडर किंवा लहान तुकडे करून भाजीमध्ये वापरता येते.


 


आंबा


तुम्ही आंबा सुकवून भाजीतही वापरू शकता. तुम्ही आंब्याची साल सोलून, कापून बिया वेगळे करा आणि उन्हात वाळवा. आंबा उन्हात चांगला सुकल्यावर त्यात कढीपत्ता, भाजी, कडधान्ये घालून उकळून घ्या.


 


फ्लॉवर


तुम्ही फ्लॉवर सुकवूनही पावसाळ्यात स्वादिष्ट भाजी म्हणून खाऊ शकता. फ्लॉवर स्वच्छ धुवा, देठ काढून त्याचे मोठे तुकडे करा आणि उन्हात वाळवा. फ्लॉवर सुकल्यावर हवाबंद डब्यात ठेवा आणि वापरण्यापूर्वी गरम पाण्यात उकळून भाजी तयार करा.


 


हेही वाचा>>>


Food :'अशी कशी देवाची करणी!' नारळाच्या आत पाणी नेमकं येतं कुठून? माहीत नसेल तर जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )