Food : फ्रॅंकी (Frankie) म्हटलं आणि तोंडाला पाणी सुटलं ना! फ्रॅंकी तशी सर्वांनाच आवडते, यामध्ये विविध पद्धतीच्या भाज्या घालून ती लहान मुलांना देखील खायला देऊ शकता. व्हेज फ्रँकी खायला खूप चविष्ट लागते. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना दुपारच्या जेवणात काही खास द्यायचे असेल तर व्हेज फ्रँकी बनवून त्यांना एकदा खायला द्या. स्ट्रीट स्टाइल व्हेज फ्रँकी रोल चवीला खूप छान लागते. उरलेल्या पोळ्या टाकून देण्याऐवजी तुम्ही त्यांच्याकडून स्वादिष्ट फ्रँकी रोल बनवू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, या रोलची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. बाहेरच्या जंक फूड पेक्षा हे आरोग्यदायी असण्यासोबतच चवदारही आहे. फ्रॅंकी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ती कशी बनवायची ते जाणून घ्या. (Lifestyle News)
बनवण्याची पद्धत
-व्हेज फ्रँकी बनवण्यासाठी तुम्हाला सर्व भाज्या कापून घ्याव्यात.
-गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तेल घाला.
-तेलाबरोबरच त्यात मिरची आणि कांदा टाकून तो परतवा
-नंतर लसूण आणि कोबी घालून लालसर करा.
-1 मिनिट पर्यंत तळा आणि लालसर होऊ द्या
-यानंतर या मिश्रणात मिरची पावडर, हळद, मीठ आणि धणेपूड घालावी लागेल.
-2 मिनिटे शिजल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करावा लागेल.
टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घालायला विसरू नका
व्हेज फ्रँकी रोल बनवण्यासाठी प्रथम कोबीचे खूप पातळ आणि लांब तुकडे करा. यानंतर ते पाण्यात चांगले धुवावे. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाकून गरम करा. आता चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत तळा आणि नंतर बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. हे देखील 2 मिनिटे तळा, आता त्यात टोमॅटो प्युरी घाला आणि चांगले शिजवा. जेव्हा ते वितळते आणि थोडे तेल सोडू लागते तेव्हा त्यात आले-लसूण पेस्ट घाला आणि सर्वकाही चांगले शिजवा. त्यात टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घालायला विसरू नका.
फ्रँकीसाठी पोळी कशी बनवाल?
तुमच्या मुलांना खाऊ देणार असाल तर तुम्ही पिठापासून हेल्दी पोळी बनवू शकता.
याशिवाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विविध पीठ घालूनही पोळी बनवू शकता.
आता वर सांगितल्या प्रमाणे तयार मिश्रण पोळीवर पसरवा.
यानंतर, तुम्ही तुमच्या आवडीचा रेड चिली सॉस किंवा सोया सॉस घालू शकता.
व्हेज फ्रँकी रोल तयार आहे. आता तुम्ही ते तुमच्या मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. ते बनवणे अगदी सोपे आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही हे मिश्रण फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळीही विविध पदार्थांमध्ये वापरू शकता.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>