Father's Day 2024 : तो बाप असतो... लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबाला कशाचीही कमतरता भासू नये, कोणत्याही संकटात पडू नये. या चिंतेत वडील नेहमी मग्न राहतात. आता मुलांनो,वेळ तुमची आहे वडिलांसाठी काहीतरी करण्याची..यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डेसारख्या प्रसंगी काहीतरी खास का करू नये? जेणेकरून वडील थोड्या वेळासाठी का होईना, पण समस्या विसरून त्यांना आनंद घेता येईल. जाणून घ्या अशा काही गेटवे आयडिया. जिथे तुम्ही वीकेंडला तुमच्या वडिलांसोबत काही खास वेळ घालवू शकता.
प्रेम आणि त्यागासाठी वडिलांचे आभार माना..
फादर्स डे हा वडिलांना समर्पित केलेला खास दिवस आहे, जो जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 16 जून रोजी साजरा केला जाणार आहे. फादर्स डे हा एक खास दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांचे प्रेम आणि त्यागासाठी आभार मानू शकता. या दिवशी, तुम्ही तुमच्या वडिलांवर तुमचे प्रेम दाखवण्यासाठी काही खास योजना देखील करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी गेटवे प्लॅन करू शकता. यामुळे तुमच्या वडिलांनाही टेन्शन फ्री टाईम मिळेल, तसेच त्यांना चांगले वाटेल. जाणून घ्या..
फादर्स डे निमित्त वडिलांसाठी खास गेटवेचा प्लॅन करा
यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत गेटवेची योजना देखील करू शकता. यामुळे त्यांचा ताण कमी होईल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मनाली
हिमाचल प्रदेशात वसलेले मनाली हे एक असे ठिकाण आहे जे तुम्हाला उष्णतेपासून आराम तर देईलच पण इथे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत काही खास वेळ घालवू शकता. येथे तुम्ही त्यांच्यासोबत अनेक मजेदार Activities देखील करू शकता. पर्वतांच्या मधोमध वसलेल्या मनालीमध्ये तुम्हाला खूप छान दृश्ये पाहायला मिळतील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे तुमच्या वडिलांसोबत स्कीइंग किंवा राफ्टिंगला जाऊ शकता. त्यांच्यासाठीही हा नवा अनुभव असेल.
सुलतानपूर पक्षी अभयारण्य
तुमच्या वडिलांना निसर्गावर खूप प्रेम आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. अशात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या वडिलांसोबत सुलतानपूर पक्षी अभयारण्यात जाऊ शकता. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे सुंदर पक्षी पाहायला मिळतील. इथे तुमच्या वडिलांनाही खूप छान वाटेल आणि ते तणाव विसरून फादर्स डे एन्जॉय करू शकतील.
सरिस्का
शांततेत दिवस घालवण्यासाठी सरिस्का हा एक चांगला पर्याय आहे. येथे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत आणि कुटुंबासह तलावाच्या काठावर पिकनिक करू शकता किंवा तुमच्या वडिलांना वन्यजीव साहसात रस असेल, तर तुम्ही येथे व्याघ्र प्रकल्पातही जाऊ शकता, जिथे तुम्हाला वाघ पाहायला मिळेल.
चकराता
उत्तराखंडमध्ये असलेले हे ठिकाण गेटवेसाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही गोंगाटापासून दूर, तुमच्या वडिलांसोबत काही खास शांततापूर्ण क्षणांचा आनंद घेऊ शकता. जरी, तुम्ही येथे स्कीइंग आणि रॅपलिंग सारख्या क्रियाकलाप देखील करू शकता, परंतु तुमच्या वडिलांना इतर activity मध्ये रस नसला तरीही, तुम्ही येथील सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकता.
ऋषिकेश
उत्तराखंडमधील ऋषिकेश हे उन्हाळ्यापासून आराम मिळण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह सुंदर दृश्य पाहू शकता, गंगा आरतीमध्ये सहभागी होऊ शकता, येथील आश्रमांना भेट देऊ शकता आणि तुमच्या वडिलांसोबत काही खास वेळ घालवू शकता.
हेही वाचा>>>
Travel : व्यस्त जीवनातून घ्या ब्रेक, फिरायला जा, मनमुराद जगा! प्रवासाचे 'हे' फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )