Earth in Solar System : तुम्हा सर्वांना माहित असेलच की, पृथ्वी (Earth) सूर्याभोवती (Sun) फिरते आणि त्यासोबत ती स्वत:भोवतीही फिरते. या विषयाबद्दल तुमच्या मनात अनेक वेळा विचार आले असतील, जसे की पृथ्वी सूर्याभोवती का फिरते? पृथ्वी गोल का फिरते आणि पृथ्वीने फिरणे थांबले तर काय होईल? पण समजा पृथ्वी एका सेकंदासाठी थांबली तर काय होईल? तर पृथ्वीवर काय परिणाम होतील? याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, कारण काही संशोधनाच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की, जर पृथ्वीने आपले फिरणे थांबवले तर काय होऊ शकते? तुम्हाला माहिती आहे का? की यामुळे तुम्हाला पृथ्वीवर एक भयावह दृश्य पाहायला मिळेल.


पृथ्वी फिरणे थांबले तर काय होईल?


सूर्याभोवती फिरण्यासोबतच पृथ्वी स्वत:भोवतीही फिरते. अशा परिस्थितीत ती अचानक थांबली तर काय होईल? पृथ्वीने स्वत:भोवती फिरणे थांबवल्यास बरेच काही बदलेल. सर्व प्रथम, दिवस आणि रात्र थांबतील. पृथ्वीच्या काही भागात कायमचा दिवस असेल तर, काही भागात कायमची रात्र असेल. म्हणजेच जो भाग सूर्याच्या दिशेला असेल, तिथे नेहमीसाठी दिवस असेल आणि पाठीमागील भाग कायमची रात्र असेल. काही भाग असे असतील जिथे सूर्योदय कायम राहील तर काही ठिकाणी सूर्यास्त दिसेल.


पृथ्वी थांबली तर?


पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे ऋतू बदलतात. अशा स्थितीत पृथ्वीने सूर्याभोवती फिरणे थांबवले तरी तिचा एक भाग नेहमी गरम आणि दुसरा भाग कायमचा थंड राहील. काही भाग असे असतील जिथे वर्षभर पाऊस पडेल तर काही भागात कायम दुष्काळाचे वातावरण निर्माण होईल.


पृथ्वीवर एक भयंकर वादळ येईल


पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1,700 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरते. पृथ्वी अचानक फिरणे थांबवल्यास वादळे वेगाने फिरू लागतील. मोठ्या आणि धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर इतकाच असतो. अशा स्थितीत पृथ्वी थांबल्यामुळे जे वादळ येईल, पृथ्वीवरील सर्व काही त्याच्या जागेवरून उडून जाईल. या वादळामुळे मोठे पर्वतही उन्मळून पडू शकतात. याशिवाय पृथ्वी थांबली तर भयंकर विध्वंस होईल. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वी बुडवेल. म्हणूनच ते जसे आहे तसे चालू राहावे, ते सर्वांसाठी चांगले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Coronavirus : सावधान! कोरोना विषाणू करतोय मेंदूवर परिणाम, 'या' गंभीर आजारांचा धोका