एक्स्प्लोर

डायबिटीस रुग्णांसाठी HbA1c चाचणी का आवश्यक? तज्ज्ञांनी दिला इशारा, दुर्लक्ष करू नका कारण...

HbA1c test importance for diabetes patients: मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रक्तातील साखरेवर दीर्घकालीन नियंत्रण ठेवण्यासाठी HbA1c चाचणी अत्यंत निर्णायक ठरत आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

HbA1c test importance for diabetes patients: बहुतेक लोकांना माहित आहे की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवल्याने हृदय, डोळे आणि मूत्रपिंडांचे संरक्षण होते. तसेच स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणासाठी HbA1c ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. HbA1c चाचणीमुळे मागील २ ते ३ महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, HbA1c नियंत्रणात ठेवल्यास मधुमेहामुळे होणार्‍या हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांचे विकार आणि मज्जासंस्थेच्या समस्या टाळता येऊ शकतात. योग्य HbA1c पातळी  असल्यास रुग्ण अधिक सक्रिय, तणावमुक्त आणि दर्जेदार जीवन जगू शकतो. मात्र, या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत राहिल्यास जीवनमानावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

HbA1c नियंत्रणासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, औषधांचे नियमित सेवन करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

ज्या लोकांची HbA1c पातळी ७% पेक्षा कमी असते, त्यांना उच्च पातळी असलेल्या लोकांच्या तुलनेत स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. तुमची HbA1c पातळी प्रत्येक १% ने वाढल्यास, तुमच्या स्वादुपिंडाला असलेला धोका जवळपास ५०% ने वाढतो. योग्य HbA1c पातळी ही तुमच्या शरीराचे 'संरक्षण' करते,अशी प्रतिक्रिया डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी(संचालक, क्रिटिकल केअर विभाग आणि प्रमुख ए अँड ई, न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.

HbA1c ७% पेक्षा कमी आणि उपाशीपोटी रक्तातील साखर १२६ mg/dL (७ mmol/L) किंवा त्यापेक्षा कमी राहिल याची खबरदारी घ्या. ही साध्य केल्यास तुमच्या शरीराला जास्तीत जास्त संरक्षण मिळते. तुमच्या डॉक्टरांना तुमच्या HbA1c पातळीबद्दल आणि ती ७% च्या जवळ आणण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल विचारा. मधुमेहाचे व्यवस्थापन करणे म्हणजे केवळ 'गुंतागुंत' टाळणे नाही; तर ते तुमच्या जीवनाचे संरक्षण करण्याचा आणि कर्करोग सुरू होण्यापूर्वीच तो टाळण्याचा एक सक्रिय मार्ग आहे. तुमची HbA1c पातळी प्रभावीपणे कमी करण्यासाठी, 'ग्लुकोजमधील अचानक वाढ' टाळणाऱ्या सवयींवर लक्ष केंद्रित करणे सर्वोत्तम आहे. जेव्हा तुम्ही ही वाढ टाळता, तेव्हा तुमची एकूण सरासरी (HbA1c) नैसर्गिकरित्या कमी होते,असे डॉ. निशांत तावडे( फॅमिली मेडिसिन , न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई)यांनी स्पष्ट केले.

डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी खाण्याच्या सवयींवर प्रकाश टाकताना सांगतात,

"परिपूर्ण ताट " हवे: तुमची अर्धे ताट हे स्टार्च नसलेल्या भाज्यांनी (पालक, ब्रोकोली, सिमला मिरची), एक चतुर्थांश प्रथिने आणि एक चतुर्थांश कर्बोदकांचा समावेश असलेले हवे.

तुमच्या जेवणाचा क्रम ठरवा: आधी फायबर आणि प्रथिनांचे सेवन करा आणि कर्बोदकांचे सेवन हे जेवणाच्या शेवटी करा, कारण यामुळे रक्तामध्ये साखर शोषली जाण्याची प्रक्रिया मंदावते.

हळूवारपणे पचणारी कर्बोदके निवडा: पांढरा ब्रेड, भात आणि साखरयुक्त पदार्थांच्या जागी ओट्स, क्विनोआ, मसूर आणि तृणधान्यांसारखे पर्याय निवडा.

द्रवस्वरुपातील साखर टाळा: सोडा, चहा आणि फळांच्या रसांऐवजी पाणी, सोडा वॉटर किंवा साखर नसलेला हर्बल चहा प्या.

जेवणानंतर १० मिनिटं चाला : जेवणानंतर केवळ १० मिनिटे चालल्याने तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर वापरली जाते आणि स्नायूंना ऊर्जा मिळते.

कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करा : दर आठवड्याला १५० मिनिटे वेगाने चालण्याचे ध्येय ठेवा, पण त्यात २ दिवस प्रतिकारशक्ती वाढवणारे व्यायाम करा.

दीर्घकाळ एकाच जागी बसणे टाळा : दर तासाला २ मिनिटांसाठी उभे राहून स्ट्रेचिंग करण्याची सवय लावा.

डॉ. निशांत तावडे सांगतात की, ७-८ तास पुरेशी झोप घ्या-  झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोल वाढतो, ज्यामुळे तुमचे शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते आणि रक्तातील साखर वाढवते.

तणावाचे व्यवस्थापन करा : जास्त तणावामुळे शरीरात साठवलेली साखर रक्तात सोडली जाते. जेव्हा तुम्हाला खूप तणाव जाणवतो, तेव्हा २ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा.

शरीरात पाण्याची पातळी योग्य राखा : निर्जलीकरणामुळे तुमच्या रक्तातील साखर अधिक केंद्रित होते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमच्या मूत्रपिंडांना अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्यास मदत होते.

डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी सांगतात की , जर तुम्ही ग्लुकोज मॉनिटर वापरत असाल, तर कोणते विशिष्ट पदार्थ तुमच्या रक्तातील साख वाढवतात हे तपासा आणि त्यांच्यासाठी आरोग्यदायी पर्याय शोधा.

औषधांचे सेवन टाळू नका : दररोज एक ठराविक वेळ निश्चित करुन त्यावेळी औषधांचे सेवन करा. एकाच वेळी सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करू नका.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget