Diwali 2022 Rangoli : येत्या 21 ऑक्टोबरपासून सगळीडे दिवाळीचा (Diwali 2022) सण साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने बाजारात विविध वस्तूंची खरेदीसाठी लगबग पाहायला मिळतेय. आता सण म्हटला की रांगोळी काढणं आलंच. बाजारात देखील विविध रंगांचे आकर्षक रांगोळीचे रंग आणि डिझाईन्स पाहायला मिळतायत. आणि हे रंग खरेदी करण्याचा मोह नागरिकांना आवरता येत नाही. तुम्ही सुद्धा या दिवाळीला दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढणार असाल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी रांगोळीचे काही प्रकार सांगणार आहोत. हे प्रकार नेमके कोणते ते पाहा.
1. फुलांची रांगोळी
या दिवाळीला विविध रंग वापरण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक विविध रंगांच्या फुलांनी रांगोळी देखील काढू शकता. या रांगोळीला तुम्ही विविध पानाफुलांनी सजवून त्यामध्ये दिवे लावू शकता.
2. मिरर रांगोळी
या दिवाळीला तुम्ही मिरर रांगोळी काढून देखील तुमच्या रांगोळीला वेगळा हटके लूक देऊ शकता. या मिरर रांगोळीमध्ये विविध रंग टाकून तिला अधिक आकर्षक बनवू शकता.
3. मोराची रांगोळी
प्रत्येक दिवाळीत मोराची रांगोळी काढलीच जाते. याचं कारण ही रांगोळी दिसायला फारच आकर्षक आणि सुंदर दिसते. तसेच, इतर रांगोळीच्या तुलनेत ही रांगोळी जरा जास्तच आकर्षक दिसते.
4. स्वस्तिक रांगोळी
या दिवाळीत तुम्ही झेंडूंच्या फुलांपासून बनवलेली स्वस्तिक रांगोळी देखील काढू शकता. ही रांगोळी अतिशय सोपी आहे. मंदिराच्या बाहेर, घराच्या बाहेर अशी रांगोळी युनिक देखील दिसेल. नारिंगी आणि पिवळ्या रंगांच्या झेंडूंच्या फुलांनी सजलेली रांगोळी अतिशय उठून दिसेल.
5. सुंदर आणि सोपी रांगोळी
दिवाळीत रांगोळी सगळ्यांनाच काढायला आवडते. मात्र, सर्वांना रांगोळी काढता येतेच असे नाही. अशा वेळी तुम्ही फक्त दिवे आणि पणतीच्या साहाय्याने सहज, सुंदर आणि सोपी रांगोळी काढू शकता. यासाठी तुमचा जास्त वेळही जाणार नाही.
6. तांदळाची रांगोळी
दिवाळीत विविध रंगांच्या, फुलांच्या, आकर्षक डिझाईनच्या रांगोळी सगळेच काढतात. मात्र, या दिवाळीत तुम्हाला काही हटके रांगोळी काढायची असेल तर तुम्ही तांदळापासून बनवलेली रांगोळी देखील काढू शकता. यामध्ये तांदळाच्या दाण्यांना तुम्ही वेगवेगळ्या रंगांनी रंगवून तुमच्या रांगोळीला आकर्षक लूक देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या :
Diwali 2022 Rangoli : दिवाळीत दारी काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी; पाहा फोटो