Diwali 2021: दिवाळी सणाची अनेक लोक आतूरतेने वाट पाहात असतात. दिवाळीला नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते. दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की लक्ष्मी देवी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट आणते.
दिवाळी 2021
पंचांगानुसार, 4 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावस्या या तिथीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यावेळी दिवाळीला तुळा राशीमध्ये चार ग्रहांची युती पहायला मिळणार आहे. या दिवशी सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र हे तुळा राशीमध्ये राहतील.
दिवाळी 2021 - शुभ मुहूर्त (Diwali 2021)
दिवाळी : 4 नोव्हेंबर, 2021, गुरुवार
अमावस्या तिथि प्रारंभ: नोव्हेंबर 04, 2021 सकाळी 06:03 पासून.
अमावस्याची तिथी समाप्त: 05 नोव्हेंबर 2021 पर्यंत 02:44 पर्यंत.
दिवाळी संबंधित
दिवाळीबद्दल अनेक गोष्टी पुराणामध्ये आणि इतिहासामध्ये लिहीलेल्या आहेत. दिवाळी हा शब्द दिवे आणि आवली म्हणजेच ओळ या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. ओळीने ठेवलेले दिवे असा या शब्दाचा अर्थ होतो. स्कन्द पुराणात दिव्यांना सूर्याच्या प्रकाशाचा प्रतिनिधी मानले जाते. दिवाळी सणाला यम आणि नचिकेता यांच्या कथेसोबत देखील जोडले जाते. भारतीय इतिहासातील पहिले जाणकार अल बरूनी यांनी त्यांच्या संस्मरणांमध्ये दिवाळीचे वर्णन केले आहे.
...म्हणून दिवाळीला दिवे लावण्याची प्रथा
दिवाळीला प्रकाशाचा आणि दिव्यांचा उत्सव मानले जाते. या सणांमध्ये घराबाहेर दिवे लावून आकर्षक रोषणाई केली जाते.दिवाळीला घराबाहेर दिवे लावण्यामागे कास कारण आहे. रामाने कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला पुन्हा परतले. राम यांच्या अयोध्येला येण्याच्या आनंदात अयोध्यामधील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावले जातात. पण दिवाळीला फटाके फोडण्याची परंपरा फार जुनी नाही. पुरातन काळात दिवाळीला फक्त दिवे लावण्याची परंपरा होती.