Condom Gown Viral Video: फॅशन जगतात (Fashion World) दररोज म्हटलं तरी नवनवीन ट्रेंड (Fashion Trend) येत असतात. तसेच, अनेक फॅशन डिझायनर्सही नवनवे प्रयोग करत असतात. असाच एक आगळा-वेगळा प्रयोग एका फॅशन डिझायनरनं केला आहे. फॅशन डिझायनरनं जे केलंय ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. सध्या फॅशन डिझायनरच्या अनोख्या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होतोय. आजवर तुम्ही कचऱ्याचा वापर करुन, लाईट्स वापरुन किंवा प्लास्टिकचा वापर करुन फॅशन डिझायनर्सनी क्लासी आणि हटके आऊटफिट्स तयार केल्याचं आपण पाहिलंय. दररोज वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करणाऱ्या उर्फीलाही या पठ्ठ्यानं मागे टाकलं आहे.  


फॅशन डिझायनरनं प्लास्टिक, लाईट्स किंवा इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करुन नाहीतर चक्क कंडोमचा (Condom Gown) वापर करुन गाऊन तयार केला आहे. आता तुम्ही म्हणाल, याला काय भलतंच सुचलं? पण यामागील फॅशन डिझायनरचा हेतू ऐकलात तर तुम्हीही त्यांच्या पाठीवर नक्कीच शाबासकीची थाप द्याल. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि डिझायनरचं कौतुकही करत आहेत. यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फॅशन डिझायनरनं त्यानं कंडोम वापरुन गाऊन कसा तयार केला, हेदेखील दाखवलं आहे.  


गुन्नार डेथरेज (Gunnar Deatherage) या विदेशी फॅशन डिझायनरनं कंडोम वापरुन सुंदर गाऊन तयार केला आहे. याचा व्हिडीओ त्यानं सविस्तर युट्यूबवर शेअर केला आहे. लैंगिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यानं एक्सपायर्ड कंडोम वापरून गाऊन डिझाइन केला आहे. 


"मी कंडोमपासून एक गाऊन बनवला आहे आणि तो खरंच फार सुंदर आहे", असं डेथरेजनं युट्यूबवर व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये फॅशन डिझायनरनं कंडोमला फुलांचा आकार देण्यासाठी पिन आणि झिप टाय वापरलं आहे. पिन आणि झिप टायचा वापर करुन फॅशन डिझायनरनं कंडोमची सुंदर फुलं तयार केली आहेत. त्यावर गोल्डन कलरही दिला आहे. व्हिडीओ जसाजसा पुढे जातो, तसातशी तुमची उत्सुकता वाढते. डिझायनर कंडोम वापरुन संपूर्ण गाऊन तयार करतो. त्यानंतर गाऊन पूर्ण झाल्यावर पाहिलात तर तुमचा विश्वास बसणार नाही. 


सध्या सोशल मीडियावर कंडोम गाऊनचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्स फॅशन डिझानरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत, तर अनेकजण हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. 1 डिसेंबर जागतिक एड्स डेच्या निमित्तानं फॅशन डिझायनरनं जनजागृती करण्यासाठी हा कंडोम गाऊन तयार केला होता. त्यानं गाऊन तयार करतानाची संपूर्ण प्रोसेस व्हिडीओमध्ये कैद केली आहे. 


फॅशन डिझायनरवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव 


फॅशन डिझायनरनं व्हिडीओ शेअर केल्यापासून या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं आहे की, "जगात टॅलेंटची कमतरता नाही." दुसऱ्या यूजरनं लिहिलं आहे की, "हे खरंच आश्चर्यकारक आहे."


पाहा व्हिडीओ :