Central Railway Special Traffic Block : मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी 23 मे 2022 ते 31 मे 2022 या कालावधीत विशेष ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहे, या ब्लॉकमुळे या मार्गावरील काही रेल्वे रद्द, तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, याबाबत रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या 


काही रेल्वे रद्द, तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल,


02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष रेल्वे 28 मे 2022 ते 02 जून 2022 (6 दिवस) पर्यंत रद्द असेल.


 






 


28 मे 2022 रोजी डाऊन गाड्यांचे नियमन
11059 लोकमान्य टिळक टर्मिनर्स - छपरा एक्सप्रेस
11061 लोकमान्य टिळक टर्मिनर्स - जयनगर एक्सप्रेस


28 मे 2022 रोजी येणार्‍या अप गाड्यांचे नियमन
12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
12142 पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
15065 गोरखपूर - पनवेल एक्सप्रेस
12520 - कामाख्या - लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
12335 भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस


'या' ट्रेनचे 28 मे 2022 चे रिशेड्युलिंग
12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस 28 मे 2022 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 29 मे 2022 रोजी 4.30 वाजता सुटेल


15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस 28 मे 2022 रोजी त्याच दिवशी 18.30 वाजता पनवेलहून सुटेल


31 मे 2022 रोजी टिटोली यार्ड येथे 05.15 ते 11.15 पर्यंत विशेष ब्लॉक


गाड्या रद्द
12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस (31-05-2022)
12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (31-05-2022)


31.05.2022 रोजी गाड्यांचे पुनर्निर्धारित वेळापत्रक 


लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10.55 वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस 12.15 वाजता सुटेल
सीएसएमटीहून 11.05 वाजता सुटणारी 82356 मुंबई पटना एक्स्प्रेस 13.00 वाजता सुटेल
पनवेलहून सुटणारी 11061 गोरखपूर एक्सप्रेस 15.50 वाजता 20.30 वाजता सुटेल