मुंबई: एअर एशियाने आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना खास भेट दिली आहे. एअर एशियाने आपल्या विमान तिकीटांच्या दरांमध्ये 799 रुपयांची खास सवलत दिली आहे.

 

दिनांक 4 जानेवारी 2017 ते 21 ऑगस्ट 2017 दरम्यान कंपनीने बिग सेल स्किम राबविली आहे. या योजनतंर्गतच कंपनीने तिकीट दरात सवलत ही सवलत दिली आहे. यासाठी कंपनीने तिकीट बुकींगचा कालावधी 19 जून 2016 पर्यंत मर्यादित ठेवला आहे.

 

या स्किमनुसार डेमेस्टीक प्रवासासाठी, गोवाहटी ते इंफाळदरम्यानचा तिकीट दर 799 रुपये ठेवण्यात आला आहे. तर बंगळूरू ते कोची दरम्यान 899 रुपये, बंगळूरू ते पुणे दरम्यान 1099 रु., दिल्ली ते बंगळूरू 2699 आणि विशाखापट्टणम ते बंगळूरू दरम्यान 1199 रुपये तिकीट दर ठेवण्यात आला असल्याची माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

 

कंपनीने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठीही तिकीट दरांमध्ये सवलत दिली आहे. या स्किमनुसार, कोची ते क्वालालंपूरचा विमान प्रवास 3999 रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे.