How to Make Moong dal chaat : रोज रोज सकाळी नाश्त्यात पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आला आहे, आणि काही तरी हलकं, चटपटीत खावसं वाटतंय, तर मूगडाळीचे चाट हा उत्तम पर्याय आहे. मूगडाळीत प्रोटीन, फायबर, विटामिनयुक्त घटक असून ते तुम्हाला दिवसभर उत्साही म्हणजेच एनर्जेटिक बनवतात. उकडलेल्या मूगडाळीचे आंबट गोड आणि चटपटीत चाट एक झटपट तयार होणारा पदार्थ तर आहेच, सोबत वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदतही करते..मात्र तो बनवतात कसा? जाणून घ्याच...

Continues below advertisement

बनवण्याची सोपी पद्धत (How to Make Moong dal chaat)

मूगडाळीचे चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • हिरवी अख्खी मूगडाळ :  1 कप (थोडसं मीठ टाकून उकडून घ्या) 
  • बारीक कापलेला कांदा  : 1 छोटा 
  • बारीक कापलेले टॉमॅटो : 1
  • बारीक कापलेले बटाटे : 2 (उकडलेले)
  • पुदिन्याची चटणी : 1 चमचा
  • चिंचेची आंबट गोड चटणी : 2 चमचा 
  • चाट मसाला : 1/2 छोटा चमचा 
  • जिरे पावडर  : 1/2 छोटा चमचा 
  • लाल मिरची पावडर : 1/4 छोटा चमचा 
  • मीठ चवीनुसार 
  • लिंबाचा रस : 1 चमचा 
  • बारीक कापलेली कोथिंबीर 
  • बारीक नायलॉन शेव सजवण्यासाठी

मूगडाळ चाट बनवण्याची पद्धत 

एका भांड्यात उकडलेली 1 कप मूगडाळ टाकून त्यात बारीक कापलेला कांदा, टॉमेटो, उकडलेले बटाटे टाका.या मिश्रणात पुदिन्याची चटणी, चिंचेची आंबट गोड चटणी, जिरे पावडर, चाट मसाला, मीठ चवीनुसार घालून मिक्स करा.वरुन लिंबाचा रस,  बारीक कापलेली कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करा .आता ही प्रोटीनयु्क्त मुगदाळ चाट एका प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक शेव टाकून सजवा. तयार आहे तुमचा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता..

Continues below advertisement

 

ही बातमी वाचा:

एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)