Benefits Of Sweet Potato : रताळे (Sweet Potato) हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सुपरफूड मानले जाते. रताळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. रताळ्याच्या सेवनामुळे आरोग्यालाही (Health) अनेक फायदे मिळतात. रताळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात बटाट्यापेक्षा जास्त स्टार्च असते. त्यात चरबी, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅलरीज आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. रताळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) देखील मजबूत राहते. रताळ्यामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत होते. रताळ्याच्या सेवनाने असे आणखी बरेच फायदे आहेत. तुम्ही रताळे उकडून तसेच भाजून देखील खाऊ शकता. रताळ्याचे आणखी काय फायदे आहेत हे जाणून घ्या. 

  


1. मधुमेह नियंत्रणात राहतो : रताळ्याच्या सेवनाने मधुमेहही नियंत्रणात राहतो. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळे उकडून त्याचे सेवन करावे. 


2. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत : रताळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. जे रताळे दिसायला अगदी जांभळ्या रंगाचे असतात ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जातात.  


3. दम्यापासून आराम मिळेल : रताळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स दम्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात.


4. हाडांसाठी फायदेशीर : रताळ्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते हाडांसाठी चांगले मानले जाते.  


5. हाय बीपीमध्ये आरामदायी : रताळं हे असं सुपरफूड आहे ज्यामुळे यामध्ये आढळणारे पोटॅशियम बीपीची समस्या दूर करण्यास मदत करतात. 


6. वजन कमी करण्यास मदत : रताळ्यामध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे वजन पेशी वाढू देत नाही. तसेच शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. एक वाटी भाजलेल्या रताळ्याचे सेवन केल्यास भूकही कमी लागते. त्यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होताना दिसेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :