How to Make Eyebrow thick: भुवयांचा आकार योग्य असेल तर तुमचे डोळे आणि खास करुन तुमचा चेहरा फार सुंदर दिसतो. पण बारीक किंवा चुकीच्या आकाराच्या भुवयांमुळे तुमचा चेहरा थकलेला (Tired) किंवा रागवलेला (Angry) दिसू शकतो. चांगल्या ग्रूम केलेल्या भुवया तुम्हाला एक फ्रेश लुक देतात, त्यामुळे मेकअप केलेला नसतानाही स्त्री अधिक सुंदर आणि स्मार्ट दिसते. दाट भुवयांना कसाही मनासारखा आकार देता येतो. तुमच्या भुवया (Eyebrow) जर विरळ होत असतील तर हे काही उपाय करून बघा...
दाट भुवयांसाठी टिप्स
लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल
लॅव्हेंडर तेल केसांच्या वाढीस मदत करू शकते, असे तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे काही थेंब 1-2 चमचे जोजोबा किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि या मिश्रणाने भुवयांवर मसाज करा. रात्रभर तेल असेच ठेवा आणि सकाळी सौम्य फेसवॉशने चेहेरा धुवा. इसेन्शियल ऑईल्स कधीच थेट त्वचेवर लावू नये, त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो. ते कायम खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळूनच लावावे.
पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली भुवयांवर लावा आणि मसाज करा. पेट्रोलियम जेली रात्रभर तशीच राहू द्या, सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. पेट्रोलियम जेली तुमच्या भुवयाखालील त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि तिचे पोषणही करते. त्याच्यामुळे भुवयांवरील केस तुटण्याची शक्यता कमी होते.
तिळाचे तेल
तिळाच्या तेलाचे काही थेंब हाताच्या बोटांवर घ्या आणि भुवयांवर मसाज करा. सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. हे तुम्ही रोज केले तर तुम्हाला काहीच दिवसांत फरक जाणवेल. तिळाच्या तेलामुळे निरोगी केस मिळतात आणि केसांची वाढ चांगली होते. कारण त्यात आवश्यक पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
ग्रीन टी
एक कप ग्रीन टी तयार करा आणि थंड होऊ द्या. चहामध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
कोरफड
कोरफडी मध्ये अॅलोनिन (Aloenin) नावाचे घटक असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. यामुळे भुवया दाट होण्यास मदत होऊ शकते. कोरफडीचा गर बोटांवर घेऊन काही मिनिटे हलक्या हाताने भुवयांवर मसाज करा. कमीतकमी 30 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा चिकट वाटत असल्यास धुवून टाका. हे तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
बदाम तेल
बदामाच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात जे केसांना पोषण देतात आणि केस मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे भुवयांवर केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळून ते दाट होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपताना आपल्या बोटांच्या टोकांवर बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि भुवयांवर तेलाचा मसाज करा. रात्रभर ठेवा आणि सकाळी स्वच्छ धुवा.
कांद्याचा रस
छोट्या कांद्याचा रस काढून भुवयांना लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. कांद्याच्या रसामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमधील घटक केसांच्या वाढीस मदत करतात, त्यामुळे तुमच्या भुवया दाट होण्यासही ते मदत करू शकते. तुमच्या बोटाच्या टोकावर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा एक थेंब घ्या आणि त्याचा भुवयांवर मसाज करा. दोन तास तसेच ठेवा आणि फेसवॉश आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा हा उपाय करा.
खोबरेल तेल
भुवयांच्या केसांची वाढ करण्यात खोबरेल तेल फायदेशीर आहे. खोबरेल तेल भुवयांच्या केसांना जलद वाढण्यास मदत करते. रात्री झोपताना कापसाचा बोळा खोबरेल तेलात बुडवून भुवयांना लावा. रात्रभर तसेच ठेवा व सकाळी चेहेरा फेसवॉशने स्वच्छ धुवा. तुम्ही दररोज भुवयांवर खोबरेल तेल लावलेत तर तुम्हाला लवकरच बदल दिसून येतील.
एरंडेल तेल
एरंडेल तेल तुमच्या भुवयांना लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. एरंडेल तेल फॅटी ऍसिडने समृद्ध आहे जे केसांच्या वाढीस मदत करू शकते.
संबंधित बातम्या:
Health Tips : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगले! असा विचार करून तुम्ही खूप चॉकलेट खाताय? तर सावधान...