Anant Ambani and Radhika Merchant Wedding Anniversary : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या शाही विवाह सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. अनंत आणि राधिका यांचं लग्न फक्त दोन जीवांचं मिलनच नव्हतं तर भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि वस्त्रोद्योगाच्या वारशाचं एक अप्रतिम दर्शन होतं.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाने जागतिक स्तरावरील मान्यवरांना, उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. या ठिकाणी भारताची सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवाची भव्यता यांचा संगम दिसून आला.
वाराणसीचा आध्यात्मिक प्रवास
या शाही विवाह सोहळ्याच्या दिवशी 'वाराणसीला नमन' अशी मुख्य थीम होती. यामुळे या वातावरणाला एक वेगळाच जिवंतपणा आला. वाराणसीचे घाट आणि छोट्या-छोट्या गल्ल्यांपासून प्रेरित होऊन, जिओ वर्ल्ड सेंटरच्या कॉन्कोर्समधील सजावटीने या पवित्र शहराचा एक भाग जिवंत केला. आध्यात्मिक परंपरेपासून ते वाराणसीची कला, संस्कृती, येथील मूल्ये, खाद्यसंस्कृती आणि लाईफस्टाईलचं या ठिकाणी हुबेहूब प्रतिबिंब पाहायला मिळालं.
शाही सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांना भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक अशा वाराणसी शहराची जणू सफरच या ठिकाणी पाहायला मिळाली. यामुळे भारताची आध्यात्मिकता आणि कलात्मकता किती भव्य आहे याची प्रचिती दिसून आली.
संस्कृतीचं भव्य प्रदर्शन
अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला भारताची ओळख दिसेल अशी थीम ठेवण्यात आली. या थीमनुसार, "रेस्प्लेंडेंटली इंडियन" ड्रेस कोडने पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करण्यास प्रोत्साहित केले आणि पाहुण्यांनी तो अगदी आकर्षक पद्धतीने कॅरी सुद्धा केला. राजेशाही पेहराव, महागड्या भरजरी साड्या ते शेरवानीवरील भरतकामामुळे भारतीय कलाकुसरीच्या भव्यतेचं जिवंत प्रदर्शन पाहायला मिळालं. कपड्यांमधील विविधता, बारीक आणि सुंदर, रेखीव नक्षीकाम तसेच, झगमगत्या रंगांच्या पॅलेटने भारतीय डिझायनर्स आणि कारागिरांच्या अफाट प्रतिभेचे प्रतिबिंब दिसले.
हा शाही विवाहसोहळा प्रामुख्याने भारताच्या संस्कृतीचा एक उत्सव ठरला. ज्यामुळे जागतिक स्तरावर देशाच्या वाढत्या सांस्कृतिक प्रभावाला अधिक बळकटी मिळाली.
लग्नापेक्षाही एक सांस्कृतिक उत्सव
मुळात, हे लग्न भारताच्या सांस्कृतिक वारशाला आणि विविधतेतील एकतेला दिलेली एक शक्तिशाली श्रद्धांजली होती. परंपरेला आधुनिक भव्यतेशी जोडून, या सोहळ्याने एक मोठा संदेश दिला: आपल्या मुळांशी जोडून, त्याचा अभिमान बाळगून जागतिक ओळख स्वीकारणे. या संदर्भात अंबानी कुटुंबाने सांगितले की,"अॅन ओड टू बनारस' या थीमसह लग्नाच्या दिवशीच्या सजावटीने जागतिक स्तरावरील नेत्यांना वाराणसीच्या घाटांमधून प्रवास करून एक अविस्मरणीय आणि चिरस्थायी असा अनुभव दिला. या थीममध्ये वाराणसी शहराची परंपरा, भक्ती, संस्कृती, कला, हस्तकला आणि पाककृतींचं अभूतपूर्व दर्शन घडविण्यात आलं."
विवाह सोहळ्यासाठी राजेशाही थाटात केलेल्या फॅशनबद्दल बोलताना ते म्हणाले, "रेस्प्लेंडंटली इंडियन' या ड्रेस कोड थीम अंतर्गत, पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांनी तसेच पाहुण्यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले."
पवित्र परंपरा आणि परिष्कृत उत्सव एकजूट करून, अंबानी-मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा भारतीय सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी एक मार्मिक क्षण होता. हा एक लग्नसोहळा तर होताच पण त्याचबरोबर एक राष्ट्रीय अभिमान आणि भारतीय संस्कृतीच्या भव्यतेचा देखील हा एक क्षण होता.
हे ही वाचा :