वायू प्रदूषण चिमुरड्यांना हानीकारक?

वायू प्रदूषण आपल्या सर्वांच्या आरोग्याला हानीकारक असून यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. एका नव्या संशोधनानुसार, वायू प्रदुषणामुळे चिमुरड्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो हे स्पष्ट झाले आहे.
संशोधनातील निष्कर्षानुसार, वायू प्रदूषणामुळे लहान मुले आणि किशोर वयीन मुलांना मानसिक आरोग्याचे विकार संभवतात.
रहदारीच्या ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणाने कोणतेही काम एकाग्रतेने करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याचे विकार संभवतात, असे स्वीडनच्या उमेआ विद्यापीठाचे प्रध्यापक अन्ना उदीन यांनी संशोधनासंदर्भात माहिती देताना सांगितले.
हा शोधनिबंध बीएमजे ओपन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
निवासी भगांमध्ये नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि धुळीकण मोठ्याप्रमाणावर असतात. याचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.