अमेरिकेतील एका तरुणाने केले स्मार्टफोनसोबत लग्न
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 05:36 PM (IST)
मुंबई: अमेरिकेतील एका तरुणाने स्मार्टफोनसोबतच लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लॉस वेगासमधील एरोन चेर्वेनाक या तरुणाने स्मार्टफोनसोबतच लग्न केले आहे. लॉस वेगास रिव्ह्यू जर्नलने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले आहे. लिटिल लास वेगास चैपलमधील एका चर्चच्या फादरनी या अनोख्या लग्नाची सर्व औपचारिकता पूर्ण केली. द लिटिल लास वेगास चैपलचे मालक मायकल केली यांनी www.ktnv.com यासंदर्भात माहिती जाहिर केली. केली यांनी यासंदर्भात महिती देताना सांगितले की, एक कलाकार आणि दिग्दर्शक चर्वेनाक यांनी आपल्या स्मार्टफोनसोबत लग्न करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. केली पुढे म्हणाले की, आज सर्वसामान्य लोक आपल्या मोबाईल फोनशी इतके जोडले गेले आहेत की, ते त्याच्याशिवाय घराबाहेरही पडू शकत नाहीत. हे एका विवाह बंधनासारखेच आहे.