23rd August 2022 Important Events :  ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट.  23 ऑगस्ट 1997 रोजी हळदीच्या (Turmeric) पेटंटबाबतचा अमेरिकेशी (America) चालू असलेला कायदेशीर लढा भारताने ( India ) जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.  1995 मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी या लढ्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. चला तर मग जाणून घेऊयात 23 ऑगस्ट दिनविशेष.


1918  : श्रेष्ठ कवी, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर  यांचा जन्म 


गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोझी झाला. ते मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहेत. 


1944 : चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म
सायरा बानू यांनी आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो तरुणांना घायाळ केलं आणि त्यांच्या मनात असणारी चुलबुली अभिनेत्री बनल्या. सायरा बानू यांचं नाव जरी काढलं तरी अजाणतेपणे त्यांची आणि दिलिप कुमार यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सर्वांमध्ये सुरू होतात.  बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री सायरा बानो ही 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे.


1968  : सुप्रसिद्ध भारतीय गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केकेंचा जन्म 


 प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला.  31 मे रोजी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. परफॉर्मन्सदरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत.
 


1973 :  अभिनेत्री मलायका अरोराचा जन्मदिवस


मलायका अरोरा ही हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आहे. तिचा जन्म 23 ऑगस्ट 1975 रोजी झाला. तिने अनेक उतकृष्ट चित्रपट दिले आहेत.    


1852 : भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांजा जन्म


1872  : भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म  


 2013 : आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन


1997 : ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन


1994 : इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन 


1975 : शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन


1974 : मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन 


1971 :  मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री  रतन साळगावकर यांचे निधन


1971 : मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन


1892 :  ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन
 


महत्वाच्या घटना  
 
2012: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.


2011 : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.


2005: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.


1997: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.


1991: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.


1990 : आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.


1966 : लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.


1942 : दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.


1942 : दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.


1914 : पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.