RRB NTPC Recruitment 2024: प्रत्येकालाच सरकारी नोकर व्हावेसे वाटते. सरकारी नोकरीसाठी आज संपूर्ण देशात तरुण-तरुणी जीवाचं रान करून अभ्यास करत आहेत. या कोट्यवधी उमेदवारांपैकी मोजक्याच तरुणांना सरकारी नोकर होण्याची संधी मिळते. केंद्र तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या विभागात भरती प्रक्रिया राबवते. दरम्यान, आता भारतीय रेल्वे विभागाने तब्बल 3445 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणसाची अट फक्त इयत्ता 12 आहे. म्हणजेच इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण झालेले असले तरी तुम्हाला सरकारी नोकर होता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?  या सर्व बाबी जाणून घेऊ या....


शिक्षणाची अट नेमकी काय?


भारतीय रेल्वे विभागाकडून टिकट क्लर्क या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही इयत्ता 12 पास असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज चालू झाले असून 20 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहेत. 


जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी भरती लागू होणार? 


रेल्वे विभागाने आपल्या नोटीफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण चार वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 3445 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल. यात कॉमर्शियल कम टिकट क्लर्क (2022), अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट (361), जूनियर क्लर्क कम टायपिस्ट (990) आणि ट्रेन क्लर्क (72) या पदांसाठी भरती राबवली जाईल. 


कधीपर्यंत अर्ज करता येणार?  


रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार हे सांगितले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर अर्जासाठीची फी जमा करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोबर 2024 आहे. तुम्हाला 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्जात दुरूस्ती करता येणार आहे.  


हेही वाचा :


टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!


Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती, 696 जागांसाठी प्रक्रिया सुरु


Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI