RRB Group D Exam Date 2022 Notice : रेल्वे भरती बोर्डाकडून (Railway Recruitment Board) ग्रुप डी (Group D) भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाईल. आरआरबी ग्रुप डी पहिल्या टप्प्याची परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत पार पडणार आहे. इतर टप्प्यांच्या परीक्षेच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येतील. उमेदवार या भरती आणि परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिसूचना वाचू शकतात.


कधी मिळणार प्रवेशपत्र?


या परीक्षेसाठी अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी ट्रॅव्हल अथॉरिटी डाउनलोड करण्याची लिंक 09 ऑगस्टला उपलब्ध (Activate) होईल. आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर 09 ऑगस्ट 2022 रोजी 10 वाजता अ‍ॅक्टिव्हेट करण्यात येईल. वेबसाईटवर परीक्षार्थी शहर आणि तारीख तपासू शकतात. नियमानुसार परीक्षेच्या चार दिवस आधी प्रवेशपत्र जारी केलं जातं. त्यानुसार, 17 ऑगस्टला परीक्षा आहे, याचं प्रवेशपत्र 13 किंवा 14 ऑगस्ट रोजी उपलब्ध होईल.


रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या


या प्रक्रियेद्वारे रेल्वेमध्ये स्तर 1 अंतर्गत 1 लाख 3 हजार 769 रिक्त पदांवर भरती केली जाईल. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 हजार 355 पदे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 15 हजार 559 पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 7 हजार 984 पदे, इतर मागासवर्गीयांसाठी 27 हजार 378 पदे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10 हजार 381 पदांचा समावेश आहे.


कोणत्या विषयाचे प्रश्न विचारले जातील?


या परीक्षेचा पेपर 100 गुणांचा असेल आणि त्या 100 प्रश्न असतील. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल. निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केला जाईल. परीक्षा 90 मिनिटांची असेल. यामध्ये सामान्य विज्ञान - 25, गणित - 25, सामान्य बुद्धिमत्ता - 30, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्समधून 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. सामान्य प्रवर्गातील उमेदवाराला उत्तीर्ण होण्यासाठी 40 टक्के, EWS प्रवर्गासाठी 40 टक्के, ओबीसीसाठी 30, SC आणि ST साठी 30-30 टक्के गुण मिळावे लागतील. त्यानंतर उत्तीर्ण परीक्षार्थींची पीईटी चाचणी होईल.


संबंधित इतर बातम्या