Mazagon Dock Shipbuilders Limited Jobs: दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. तुमची 10 वी किंवा आयटीआयचा अभ्यास पूर्ण केला असेल आणि तुम्हाला जर सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mazagondock.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 जून करण्यात आली आहे.

Continues below advertisement

कोण अर्ज करू शकते?

या भरतीमध्ये फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण केले आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र मिळवले आहे. ही भरती तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक उत्तम संधी आहे, विशेषतः भारतीय नौदल, जहाज बांधणी आणि उत्पादन क्षेत्रात रस असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. तर राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

Continues below advertisement

किती पगार मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा 35400 ते 112400 रुपये वेतन मिळेल. यासोबतच केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा देखील उपलब्ध असतील.

कशी होणार निवड प्रक्रिया?

ऑनलाइन परीक्षा (संगणक आधारित चाचणी)

कागदपत्र पडताळणी

वैद्यकीय परीक्षा (आरोग्य चाचणी)

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम mazagondock.in या वेबसाइटवर जा.

नंतर होमपेजवरील "भरती" टॅबवर क्लिक करा.

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 लिंकवर क्लिक करा.

आता अर्ज फॉर्म उघडेल, ज्यामध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

फोटो, स्वाक्षरी, 10 वीची गुणपत्रिका आणि आयटीआय प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

दरम्यान, जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांनी तातडीने नोकरीसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 जून आहे. त्यामुळं उमेदवारांनी 30 जूनच्या आधी अर्ज करावेत. 

महत्वाच्या बातम्या:

10 वी 12 वी झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास