Govt job 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या 169 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024
या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक अभियंता यांच्यासह विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक पात्रता काय? किती मिळणार पगार?
SBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव असणं गरजेचं आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 48,480 रुपये ते 85,920 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. याशिवाय बँकेकडून इतर भत्ते आणि फायदेही दिले जाणार आहेत
22 नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रकिया सुरु
या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 असणार आहे. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी, प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा. त्यानंतर होमपेजवरील “करंट व्हेकन्सीज” या लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांनी संबंधित लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा आणि सबमिट करावा. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी 12 डिसेंबरपूर्वी अर्ज करणं गरजेचं आहे.
युवकांसाठी मोठी संधी
दरम्यान, ज्या युवकांना सध्या नोकरीची गरज आहे किंवा ते युवक सरकारी नोकरी शोधत आहेत, अशांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या पदावर संबंधित उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना पगार देखील चांगला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांना महिना 85 हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे. तसेच वेगवेगळे भत्ते दिले जाणार आहेत. त्यामुळं या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: