Railway Recruitment 2025 : जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway ) करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), RRC नागपूर विभागाने अप्रेंटिसच्या 1007 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर, उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.
रिक्त पदांची माहिती येथे आहे
या भरतीअंतर्गत, SECR ने एकूण 1007 पदांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. यापैकी 919 पदे नागपूर विभागासाठी राखीव आहेत आणि 88 पदे वर्कशॉप मोतीबागसाठी राखीव आहेत.
आवश्यक पात्रता काय?
या भरतीमध्ये फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी (50% गुणांसह) उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे (5 एप्रिल 2025 रोजी). अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत मिळेल. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसींना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाईल.
तुम्हाला एवढी मोठी अर्ज फी भरावी लागेल
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
स्टायपेंड किती आहे?
2 वर्षांचा आयटीआय कोर्स असलेले: दरमहा 8050 रुपये
1वर्षाचा आयटीआय कोर्स असलेले: दरमहा 7700 रुपये
कसा कराल अर्ज?
उमेदवारांनी प्रथम secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
यानंतर नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा.
त्यानंतर अर्ज फॉर्ममधील माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आता अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
यानंतर, फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सेव्ह करा.
महत्वाच्या बातम्या: