Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक या ठिकाणी 318, मालेगाव महानगरपालिकेत 42, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणमध्ये 39 आणि भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद या ठिकाणी 12 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासंबंधी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तर,

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, MPW साठी 12वी विज्ञान, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स, स्टाफ नर्स पदासाठी G.N.M. कोर्स/B.sc नर्सिंग

एकूण जागा - 318

नोकरीचं ठिकाण - नाशिक

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक - 422001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022

तपशील- zpnashik.maharashtra.gov.in

मालेगाव महानगरपालिका

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, MPW साठी 12वी विज्ञान आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्ट कोर्स, स्टाफ नर्ससाठी G.N.M. कोर्स /B.sc नर्सिंग झालेलं असलं पाहिजे.

एकूण जागा - 42

नोकरीचं ठिकाण - मालेगाव

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक – 422001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022

तपशील - malegaoncorporation.org

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण

पोस्ट - प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, टायपिस्ट, वेल्डर, मशिनिस्ट, सुतार

शैक्षणिक पात्रता - AICTE/PCI/ COA, राज्य सरकार निर्देशानुसार

एकूण जागा - 39

मुलाखतीचं ठिकाण - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण, श्रीमंत शिवाजी राजे नगर-ठाकुरकी फलटण, जिल्हा-सातारा, महाराष्ट्र - 415523

नोकरीचं ठिकाण - सातारा

मुलाखतीची तारीख - 29 ऑगस्ट 2022

तपशील - www.coephaltan.edu.in

भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद

पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता - बी.कॉम., एम.कॉम., पदवीधर

एकूण जागा - 12

ईमेल आयडीवर तु्म्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ईमेल आयडी आहे- infobbns1996@gmail.com

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2022