Maharashtra Teacher Recruitment:  शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोरआलीआहे. राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Maharashtra Teacher Recruitment 2026) प्रक्रियाराबवलीजाणारआहे. पवित्र पोर्टलद्वारे (Portal for Visible to All Teachers Recruitment) ही भरती प्रक्रिया (Teacher Recruitment 2026) राबवली जाणार असल्याचीमाहितीआहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, शासकीय शाळांतील शिक्षकांच्या 30 हजार 209 पदांसाठी पवित्र संकेतस्थळामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार. दरम्यान, प्रक्रियेअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना 11 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने, रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाल्या आहे. परिणामीआता भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना दिलासा मिळालाआहे.

Continues below advertisement

पवित्र पोर्टल द्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार (Portal for Visible to All Teachers Recruitment) 

पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने, रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना दिलासा मिळणारआहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता 1 ली ते 12 वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80 टक्के पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे.

Continues below advertisement

Maharashtra Teacher Recruitment: पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण, एकूण 30,209 रिक्त पदांच्या भरती

पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या 13,352 मनपाच्या-1,954, नगर पालिका/परिषदाच्या 280 व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12,148१ अशा एकूण 30,209 रिक्त पदांच्या भरती करण्यात येणार. पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.

Teacher Recruitment:  उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेत स्थळावर कोणतेआणिकालावधीकिती?

उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक 06/08/2026 रोजी दिली आहे.

उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 06/08/2026 ते 11/08/2026 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.