Thane Muncipal corporation Bharti:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेत ६३ रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून या पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट अशा ६३ जागांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार असून  महिना 20 हजार पगार देण्यात येणार आहे. यासाठी पात्रता काय? वयोमर्यादा, आणि कुठे अर्ज करायचा पाहूया..

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत देण्यात आलेल्या अधिसूचनेअंतर्गत एकूण ६३ जागांसाठी थेट मुलाखत होणार असून  शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदांसाठी इच्छूकांना थेट मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारिख ३० सप्टेंबर आणि ३ व ४ ऑक्टोबर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोणत्या पदांच्या किती जागा?

शस्त्रक्रिया सहाय्यक - १५ जागान्हावी - २ जागाड्रेसर - १० जागावॉर्डबॉय- ११ जागादवाखाना आया - १७ जागापोस्टमार्टम अटेंडन्ट - ४ जागामॉच्युरी अटेंडन्ट - ४ जागा

शैक्षणिक पात्रता काय?

  • शस्त्रक्रीया सहाय्यक या पदासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण झालेली असावी. शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील ओ. टी टक्नोलॉजीमधील पदवी आवश्यक असून मान्यताप्राप्त विद्यापीठाची   ओ.टी.टेक्नॉलॉजी मधली पदवी असल्यास, प्राधान्य दिले जाईल. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. 
  • उर्वरित पदांसाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण  असणे गरजेचे आहे. SSC बोर्डाचे प्रमाणपत्र व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच हॉस्पीटलमध्ये काम करण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार किती राहणार?

शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी या पदासाठी २०,००० रुपये पगार देण्यात येईल.ड्रेसर,वॉर्डबॉय,दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदासाठी २०,००० रुपये वेतन देण्यात येईल.

जाणून घ्या पदनिहाय सविस्तर माहिती

शस्त्रक्रिया सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: १२ (Science) उत्तीर्ण, OT टेक्नोलॉजी डिप्लोमा

एकूण जागा - १५

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत: ३० सप्टेंबर & ०३,०४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in

---ड्रेसर

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, ITI (ड्रेसर)

एकूण जागा - १०

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत: ३० सप्टेंबर & ०३,०४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in-----वार्ड बॉय

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, ०३ वर्षे अनुभव

एकूण जागा - ११

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत: ३० सप्टेंबर & ०३,०४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in

-----दवाखाना आया

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, ०३ वर्षे अनुभव

एकूण जागा - १७

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे

थेट मुलाखत: ३० सप्टेंबर & ०३,०४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in

हेही वाचा:

नोकरीच्या शोधात आहात? महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती