एक्स्प्लोर

बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी! 'या' कंपनीत नोकरीची मोठी संधी, 1500 कोटींची गुंतवणूक होणार

Job opportunity : नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे.

Job opportunity : नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. लेन्सकार्ट कंपनीत विविध पदांसाठी लवकरच मोठी भरती केली जाणार आहे. लेन्सकार्ट (Lenskart) कंपनी तेलंगणा राज्यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने तेलंगणा सरकारसोबत एक सामंजस्य करार केला, ज्या अंतर्गत राज्यात सुमारे 1500 कोटी रुपये खर्चून चष्मा निर्मिती करणारा उभारणार आहे. यामुळं सुमारे 2100 लोकांना रोजगार मिळणार आहे. हा जगातील सर्वात मोठा चष्मा निर्मिती कारखाना असणार आहे. 

तेलंगणात जगातील सर्वात मोठा प्लांट उभारणार

राज्याचे उद्योग आणि आयटी मंत्री डी श्रीधर बाबू यांनी ट्विटरवरील याबाबतची माहिती दिली आहे. लेन्सकार्टसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा झाली आहे. याचा आम्हाला खूप आनंद असल्याचे ते म्हणाले. या अंतर्गत, कंपनी तेलंगणामध्ये 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जगातील सर्वात मोठे आयवेअर उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. हे उत्पादन युनिट डोळ्यांशी संबंधित सर्व वस्तू जसे की लेन्स, सनग्लासेस इत्यादी तयार करणार आहे.

तेलंगणातून मोठ्या प्रमाणात उत्पादनेही आयात केली जाणार 

श्रीधर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील उत्पादने दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्यपूर्वेतही निर्यात केली जाणार आहेत. या युनिटच्या स्थापनेमुळे 2100 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. याशिवाय यासंबंधी संशोधन आणि विकास केंद्रही स्थापन करता येईल. मंत्र्यांनी असेही सांगितले की कारखान्यासाठी नवीन जमीन शोधण्यात आली आहे, जी या आठवड्यात लेन्सकार्टला दिली जाईल. एप्रिलमध्ये, लेन्सकार्टचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी लिंक्डइनवर एका पोस्टद्वारे सांगितले होते की कंपनी बंगळुरुमधील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 60 किलोमीटरच्या अंतरावर कारखान्यासाठी 25 एकर जागा शोधत आहे. मात्र, सध्या तेलंगणामध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.  

सरकारला एक वर्ष होताच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला करार

8 डिसेंबर रोजी, रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कार्यक्रमात अमित चौधरी म्हणाले की कंपनी अनेक राज्यांमध्ये यासाठी शक्यता शोधत आहे. मात्र तेलंगणाच्या वाढीमुळे प्रभावित होऊन त्यांनी सरकारसोबत हा करार केला आहे. कंपनीने जगातील पहिले स्वयंचलित उत्पादन युनिट भिवडी, राजस्थान येथे सुरू केले. सध्या कंपनीचे दिल्ली, गुरुग्राम तसेच चीनमधील झेंगझो येथे उत्पादन युनिट आहेत. कंपनी बेंगळुरूमध्ये 1600 कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट उभारणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
दिल्लीत सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिल्लीत सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI Assistant Recruitment : आरबीआयमध्ये असिस्टंट पदाच्या 650 जागांसाठी भरती, 58514 रुपये पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
आरबीआयमध्ये असिस्टंट पदाच्या 650 जागांसाठी भरती, 58514 रुपये पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget