Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर, मुंबई उच्च न्यायालय आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येहे सहाय्यक प्राध्यप पदासह विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ
पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : UGC नियमानुसार
एकूण जागा : 148
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
मुलाखतीचा पत्ता : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, 48/1, ए, एरंडवना, पौड रोड, पुणे-38
मुलाखतीची तारीख : 6 सप्टेंबर 2022
तपशील : pdeapune.org
VSPM एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर नागपूर
पोस्ट : अधिष्ठाता/ प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक
शैक्षणिक पात्रता : अधिष्ठाता/ प्राचार्य, प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी, वाचक आणि व्याख्याता पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी.
एकूण जागा : 87
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरचे सचिव, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर – ४४० ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022
तपशील : nkpsims.in
दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर
पोस्ट - प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
एकूण जागा : 19
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सचिव, नगर युवक शिक्षण संस्था, आत्रे लेआउट, प्रताप नगर, नागपूर- ४४१११०
अर्ज करण्याची अंतिम तारीख- १३ सप्टेंबर २०२२
तपशील : www.dmcop.edu.in
मुंबई उच्च न्यायालय
पोस्ट : असोसिएट
शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी
एकूण जागा : 11
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022
तपशील : bombayhighcourt.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे
पोस्ट : तांत्रिक सहाय्यक (अग्नि आणि सुरक्षा), तांत्रिक सहाय्यक (आयटी)
शैक्षणिक पात्रता - B.E. (Fire), B.E. / B. Tech. Degree in Electronics
एकूण जागा : 02
वयोमर्यादा : 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2022
तपशील : www.iiserpune.ac.in