Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड,  विणकर सेवा केंद्र मुंबई ,  भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिसाठी पात्र उमेदवारंना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड

पोस्ट : बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरेपिस्ट

शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस Gyn / डीजीओ / डीएनबी, MBBS, पदवीधर, दोन वर्षांचा अनुभव

एकूण जागा :  06

वयोमर्यादा : 38  वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : नांदेड

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीची तारीख :  23 डिसेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता : सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड

अधिकृत वेबसाईट : www.zpnanded.in 

विणकर सेवा केंद्र मुंबई

पोस्ट :  कनिष्ठ विणकर, परिचर

शैक्षणिक पात्रता :  10वी पास, ITI, संबंधित विषयात डिप्लोमा

एकूण जागा : 05

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई – 400004अर्ज करण्याची शेवटची तारीख :  30 जानेवारी 2023

तपशील : handlooms.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर

पोस्ट : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :  इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा  : 15

नोकरीचं ठिकाण :  नागपूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : iiitn.ac.in 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.   

पोस्ट :  ट्रेनी इंजिनिअर - I

शैक्षणिक पात्रता  : BE/B.Tech/B.Sc Engg., 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 09

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : महाराष्ट्र

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. DGM (HR/COMPS & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru -560013

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2022

तपशील : www.bel-india.in