Job Majha  : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि, राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये  विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे

विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा : 43

पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : B.Sc, DMLT

एकूण जागा : 40

पोस्ट : स्टाफ नर्स (पुरुष आणि स्त्री )

शैक्षणिक पात्रता : B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

एकूण जागा : 02

नोकरीचं ठिकाण : ठाणे, वसई-विरार, पनवेल

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे (प.) 400604

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 28 नोव्हेंबर 2022

तपशील : thanecity.gov.in  (नवीन माहितीमध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. (IOCL)

पोस्ट : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, ITI, पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा : 465

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : iocl.com 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर : I, प्रोजेक्ट इंजिनिअर - I

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech/B.Sc Engg. आणि ट्रेनी इंजिनिअर - I साठी ६ महिन्यांचा अनुभव, प्रोजेक्ट इंजिनिअर I साठी २ वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा : 111 (यात ट्रेनी इंजिनिअर-I साठी ६१ जागा, प्रोजेक्ट इंजिनिअर-I साठी ५० जागा आहेत.)

वयोमर्यादा :  ट्रेनी इंजिनिअर - I साठी २८ वर्षांपर्यंत, प्रोजेक्ट इंजिनिअर - I साठी ३२ वर्षांपर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता - Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru – 560 013

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2022

तपशील : bel-india.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment advertisement वर क्लिक करा. बंगळुरु आणि नवी मुंबई याठिकाणी होणाऱ्या भरतीसंदर्भात संबंधित पोस्टसंदर्भातली वेगवेगळी लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)