Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुसंवर्धन विभागासाठी आणि रेल्वे विभागाकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
MPSC मार्फत पशुसंवर्धन विभाग
पोस्ट - पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट- अ
शैक्षणिक पात्रता - पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र आणि पशुसंवर्धन पदवी
एकूण जागा - 298
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 जून 2022
तपशील - www.mpsc.gov.in
...................................................
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग
पद - ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता-10वी पास, ITI कोर्स
एकूण जागा - 1044
वयोमर्यादा -
अंतिम तारीख - 3 जून 2022
तपशील - secr.indianrailways.gov.in
..........................................
अणूऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई
पद – शिक्षक
शैक्षणिक पात्रता – GPA/ CGPA
एकूण जागा - 205
वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
अंतिम तारीख -12 जून 2022
तपशील - www.aees.gov.in ( या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. 21 मे रोजी जाहीर झालेल्या RECRUITMENT NOTICE - Recruitment Notice no. AEES/01/2022 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मध्य रेल्वे मुंबई
पोस्ट – कंत्राटी डॉक्टर (contract medical practitioner)
शैक्षणिक पात्रता – MBBS
एकूण जागा – 12
वयोमर्यादा – 53 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याचा ईमेल आयडी - pgazbb@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022