Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, बँक ऑफ बडोदा आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग (भारत सरकार- पृथ्वी विज्ञान मंत्रालय)
पोस्ट - सायंटिफिक असिस्टंट (वैज्ञानिक सहाय्यक) ग्रुप-बी
शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवीधर किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
एकूण जागा - 990
वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.ssc-cr.org
बँक ऑफ बडोदा
विविध पदांच्या 346 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - सिनियर रिलेशनशीप मॅनेजर
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 320
वयोमर्यादा - 24 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2022
तपशील - www.bankofbaroda.in
पोस्ट - ई-वेल्थ रिलेशनशीप मॅनेजर
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, दीड वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 24
वयोमर्यादा - 23 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2022
तपशील -www.bankofbaroda.in
पोस्ट - ग्रुप सेल्स हेड, ऑपरेशन हेड वेल्थ
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 2
वयोमर्यादा - ग्रुप सेल्स हेडसाठी 31 ते 45 वर्ष आणि ऑपरेशन हेड वेल्थसाठी 35 ते 50 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2022
तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. current opportunities मध्ये know more वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. know more वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/ M.Ed./ B.Ed.
एकूण जागा - 10
अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राचार्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय सांगवी, ता. अहमदपूर, जि. लातूर- ४१३ ५१५
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
तपशील -www.srtmun.ac.in