Job Majha : आजही प्रत्येक तरुणाची पहिली पसंती सरकारी नोकरीलाच असते. आजही शहरांसह खेड्यापाड्यांत सरकारी नोकरी म्हटलं की, लग्नासाठी स्थळांची रांग लागते. मग ती मुलगा असो वा मुलगी. सरकारी नोकरी अन् बक्कळ पगार असं समीकरणंच सर्वांच्या मनात तयार झालेलं आहे. तुम्हीही त्याच तरुणांच्या रांगेत असाल आणि सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असाल, तर तुमच्यासाठी नामी संधी आहे.  बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (Border Road Organisation) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही नोकरीची वाट पाहत असाल, तर आजच अर्ज करा... 

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन

एकूण रिक्त जागा : 466

ड्राफ्ट्समन 

  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
  • एकूण जागा - 16
  • वयोमयादा : 18 ते 27 वर्षे 
  • अर्ज करण्याची तारीख - अद्याप जाहीर नाही 
  • अधिकृत वेबसाईट-  bro.gov.in 

टर्नर 

  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
  • एकूण जागा - 10
  • वयोमयादा : 18 ते  27 वर्षे 
  • अर्ज करण्याची तारीख - अद्याप जाहीर नाही 
  • अधिकृत वेबसाईट-  bro.gov.in 

ड्रायव्हर मेकॅनिस्ट ट्रान्सपोर्ट 

  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
  • एकूण जागा - 417
  • वयोमयादा : 18 ते 27  वर्षे 
  • अर्ज करण्याची तारीख - अद्याप जाहीर नाही 
  • अधिकृत वेबसाईट-  bro.gov.in 

ऑपरेटर उत्खनन मशिनरी 

  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
  • एकूण जागा - 18
  • वयोमयादा : 18 ते 27 वर्षे 
  • अर्ज करण्याची तारीख - अद्याप जाहीर नाही 
  • अधिकृत वेबसाईट-  bro.gov.in