Job Alert: चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या कोणत्याही पदवीधराला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असतेच.  आता विदर्भातील पदवीधरासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील नगर परिषद कार्यालयात पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून कंत्राटी पदावर भरल्या जाणाऱ्या या पदासाठी महिना ४५ हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांना कारंजा, जि वाशिम हे नोकरीचे ठिकाण राहणार असून या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.


११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर होणार भरती


कारंजा नगरपरिषदेकडून निघालेल्या जाहिरातीनुसार, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर ही भरती केली जात असून शहर समन्वयकाचे पद भरण्यासाठी जाहीर सूचना काढण्यात आली आहे. कारंजा जि. वाशिम नगर परिषद विभागात आवक जावक विभागात जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून दि १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.


पात्रता काय?


वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेतील शहर समन्वयक पदासाठी इच्छूक असलेल्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातील कोणत्याही शाखेतील पदवी मिळवणे आवश्यक आहे. 


बी.ई, बीटेक, बी आर्ट, बी प्लानिंग, बीएससी अशा कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक


अनुभव नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव आवश्यक


कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष, अनुभव असणाऱ्या उमेदवारास अनुभवाइतकी वयोमर्यादा शिथिल  राहील.


सविस्तर अटी व शर्ती इतर माहिती विभाग प्रमुख, आरोग्य विभाग येथे वाचता येतील. 


वेळापत्रक बदल, मुलाखत वेळ व इतर सुचना उमेदवारास त्यांनी सादर केलेल्या इमेलवर सांगण्यात येईल.


ऑफलाईन पद्धतीनं करा अर्ज


या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन (Offline) आहे. तरी इच्छुकांनी जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासुन दिनांक दि. १०/०९/२०२४ ते दि. १९/०९/२०२४ (शासकीय सुट्टी वगळून) दुपारी ५.०० वाजेपर्यंत आवक जावक विभाग, नगर परिषद कायालय, कारंजा जि. वाशिम येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.