IFFCO Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी पदवीधर अभियंते अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट gea.iffco.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच, अर्जाची प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.


वेतनश्रेणी 


इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड पदवीधर अभियंता शिकाऊ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35000 रुपये मानधन दिले जाईल. 


वयोमर्यादा 


भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 30 वर्ष आणि किमान वय 18 वर्ष असावं. तथापी, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 5 वर्ष आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट असेल. 


शैक्षणिक योग्यता 


याशिवाय, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल डिसिप्लिन ऑफ इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.


निवड प्रक्रिया 


प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी निवड ही प्राथमिक ऑनलाइन चाचणी, अंतिम चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. अंतिम चाचणी अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा आणि मुंबईसह इतर ठिकाणी होणार आहे. यासाठी कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :