Railway Job News : रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. तुमची पात्रता जर 10 वी किंवा आयटीआय असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रयागराज येथील रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) द्वारे आयोजित उत्तर मध्य रेल्वेमध्ये 1 हजार 763 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, rrcpryj.org ला भेट देऊन अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही भरती उत्तर मध्य रेल्वेच्या विविध विभागांमधील अप्रेंटिस पदांसाठी आहे. ही भरती 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय पात्र उमेदवारांना रेल्वेमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रदान करते.

Continues below advertisement

आवश्यक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी (एसएससी) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षेत किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

वय मर्यादेबाबत, 16 सप्टेंबर 2025 रोजी अर्जदारांचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट मिळेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादा, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची अतिरिक्त सूट मिळेल.

Continues below advertisement

अर्ज करण्यासाठी किती फी? 

अर्ज शुल्काबाबत, सामान्य आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती, जमाती, महिला, ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क ऑनलाइन भरले जाईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. प्रथम, उमेदवारांनी rrcpryj.org वेबसाइटला भेट द्यावी आणि "अ‍ॅक्ट अप्रेंटिस भरती 2025लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर, अर्ज फॉर्म भरा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो आणि स्वाक्षरीसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर, अर्ज फी भरा आणि सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा. सबमिट केल्यानंतर, अर्ज फॉर्मची प्रिंटआउट ठेवा. दरम्यान, ज्या तरुणांना रेल्वेत नोकरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळं पात्रअसणाऱ्या उमेदवारांनी तातडीने या पदांसाठी अर्ज करावेत. कमी शिक्षण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Talathi Bharti : मोठी बातमी! तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य देणार, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय