प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. जवळजवळ प्रत्येक तरुणाने अशा सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) प्रयत्न केलेलाच असतो. मात्र आता तरुण-तरुणींना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होऊन सरकारी नोकर होता येऊ शकते. कारण त्यासाठीची अर्जप्रक्रिया चालू झाली आहे. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतही (Mumbai Municipal Corporation Jobs) विविध युवा प्रशिक्षण पदे भरली जात आहेत. राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात रचना सहायक गट ब, उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) या पदांसाठी भरती होत आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी शिक्षणाची अट ही इयत्ता बारावी, दहावी एवढीच आहे. त्यामुळे या सर्व पदांसाठी भरती कशी राबवली जाणार आहे? अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे? हे जाणून घेऊ या...
 


गडचिरोली जिल्हा परिषद


प्राथमिक शिक्षक


शैक्षणिक पात्रता: HSC, D.Ed किंवा TET


एकूण जागा - 419


वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे


ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024


अधिकृत संकेतस्थळ : zpgadchiroli.in
----


पदवीधर प्राथमिक शिक्षक


शैक्षणिक पात्रता: D.Ed.किंवा B.Ed.


एकूण जागा - 120


अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024


अधिकृत संकेतस्थळ : zpgadchiroli.in
---
नवी मुंबई महानगरपालिका (CMYKPY)


पदाचे नाव : विविध युवा प्रशिक्षण पदे


शैक्षणिक पात्रता: 12 वी/ITI/ पदवीधर


एकूण जागा- 194


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


शिबिराची तारीख: 20 ऑगस्ट 2024


अधिकृत वेबसाईट - rojgar.mahaswayam.gov.in
------


राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग


एकूण रिक्त जागा : 289
----
रचना सहायक (गट ब)


शैक्षणिक पात्रता :तंत्रज्ञान डिप्लोमा


एकूण जागा - 261


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024


अधिकृत संकेतस्थळ : dtp.maharashtra.gov.in
---
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण उत्तीर्ण, टंकलेखन


एकूण जागा - 09


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024


अधिकृत संकेतस्थळ : dtp.maharashtra.gov.in
---
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण उत्तीर्ण, टंकलेखन


एकूण जागा - 19


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024


अधिकृत संकेतस्थळ : dtp.maharashtra.gov.in


हेही वाचा :


धक्कादायक


! नोकरी करणं कठीण, 57 टक्के नोकऱ्यांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी पगार, मुलभूत गरजा पूर्ण करणही अवघड 


नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!


रेल्वेत नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, जवळपास 1500 पदांवर भरती, आजच अर्ज करा