Government Jobs Recruitment 2024 : यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससी (UPSC) माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार रिक्त जागांसाठी नोकरीची (Job) संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, डीटीयूमध्ये (DTU) असिस्टंट प्रोफेसर बनण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. या ठिकणी यूपीएससीने स्टाफसाठी 2930 पदासांठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी, संबंधित पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावा असं सांगण्यात आलं आहे. 


यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससीने स्टाफसाठी 2930 पदासांठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी बीएससी नर्सिंग किंवा GNM कोर्स केलेले उमेदवार upsconline.nic.in या संकेतस्थळावर अप्लाय करू शकतात. 


वयोमर्यादा किती असावी? 


संबंधित जागांसाठी इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावं. 


अर्ज करण्याची अंतिम तारीख 


या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2024 पर्यंत आहे. 


2. दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसरसाठी जागा 


दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसरसाठी तब्बल 158 पदांसाठी रिक्त जागा आहेत. 


उमेदवाराची पात्रता काय असावी?


यासाठी उमेदवाराची पात्रता उमेदवारांचे UGC NET आणि PHD चे उमेदवार अर्ज करू शकतात. 


अर्ज कुठे कराल?


या पदासाठी इच्छुक उमेदवार dtu.ac.in या संकेतस्थळावर जाऊन अप्लाय करू शकतात. 


वयोमर्यादा किती असावी? 


संबंधित पोस्टसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा साधारण 18 ते 35 वर्ष इतकी असावी. 


अर्ज करण्याची अंतिम तारीख किती? 


जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी 14 एप्रिलपर्यंत अर्ज करावा. 


महत्त्वाच्या बातम्या :


Government Jobs in March 2024 : शिक्षक, रेल्वे, पोलीस, ते बँकापर्यंत; केंद्र आणि राज्यात सरकारी नोकऱ्यांची मोठी संधी, त्वरित करा अर्ज