Government Job 2024 : सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात (AIIMS) मध्ये नोकरीची (Job) संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. यासाठी AIIMS देवघरने विविध विभागांमध्ये वरिष्ठ निवासी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 100 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. पण, या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क काय असणार आहे या संबंधित तपशील माहिती जाणून घेऊयात.

  


आवश्यक शैक्षणिक पात्रता


AIIMS मधील विविध पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD, MS किंवा DNI) असणं आवश्यक आहे.   


वय मर्यादा


अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमाल 45 वर्ष असावे. तसेच, सर्व आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. 


अर्ज फी


सामान्य श्रेणी - 3,000 रु. 


ओबीसी वर्ग - 1,000 रु. 


एससी-एसटी श्रेणी - अर्ज फीमध्ये संपूर्ण सूट


अपंग श्रेणी - अर्ज शुल्कात संपूर्ण सूट


अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी? 


विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.


किती पगार मिळणार?


या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 11 नुसार दरमहा 67,700 रुपये दिले जातील. याशिवाय एनपीए आणि सामान्य भत्तेही दिले जातील.


भरती प्रक्रिया कशी असेल?


AIIMS देवघर भरती समितीने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.


'असा' करा अर्ज


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अधिकृत मेल आयडी sr.recruitment@aiimsdeoghar.edu.in वर जमा करायचे आहेत. इच्छित पदांसाठी जे कागदपत्र लागणार आहेत त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. 


1. जन्मतारखेचा दाखला आणि इयत्ता दहावी, बारावीचे प्रमाणपत्र
2. MBBS गुणपत्रिका
3. MBBS पदवी
4. MD/DNB गुणपत्रिका
5. MD/DNB पदवी
6. इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
7. Attempt Certificate
8. Experience Certificate
9. MCI/ NBE द्वारे आयोजित SMC नोंदणी/ FMGE प्रमाणपत्र (विदेशी पदवीधरांसाठी)
10. सध्याच्या नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)
11. सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले SC/ST/OBC/PH प्रमाणपत्र (लागू असल्यास)
12. इतर कोणत्याही प्रत संबंधित कागदपत्रे (प्रकाशने, पुरस्कार, फेलोशिप, पेटंट, पुस्तके/लेखन इ.)


महत्त्वाच्या बातम्या :


ED Recruitment 2024 : ED मध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी, तब्बल दीड लाख पगार मिळणार; 'येथे' करा अर्ज